
Safest Cars in India: भारतातील टॉप-5 सुरक्षित कार, अपघातानंतरही चालक-प्रवासी राहतील सेफ
Safest Cars In India: रस्ते अपघातात दरवर्षी शेकडो लोकांना आपले प्राण गमवावे लागतात. अनेक अपघातांमध्ये गाडी चालकाची चूक असल्याचे पाहायला मिळते. काही दिवसांपूर्वीच भाजप आमदार जयकुमार गोरे यांच्या गाडीचा अपघात झाला होता. तर आता क्रिकेटपटू ऋषभ पंतच्या मर्सिडीज बेंझ गाडीचा अपघात झाला आहे. अपघातामध्ये चालक व प्रवाशांना इजा होऊ नये यासाठी गाडीत अनेक सेफ्टी फीचर्स दिले जातात.
गाडीच्या सेफ्टीबाबत वेळोवेळी Global NCAP कडून रेटिंग देखील जारी केले जाते. भारतीय रस्त्यांवर धावणाऱ्या अशाच टॉप-५ कारविषयी सविस्तर जाणून घेऊया. (Top 5 Safest Cars in India)
हेही वाचा: Pebble Watch: अवघ्या ४ हजारात Apple Watch Ultra सारखे घड्याळ, कॉलिंगचाही सपोर्ट; पाहा फीचर्स

Mahindra XUV700
Mahindra XUV700
या लिस्टमध्ये Mahindra XUV700 पहिल्या क्रमांकावर आहे. या कारला गेल्यावर्षी क्रॅश टेस्टमध्ये फाइव्ह-स्टार रेटिंग मिळाले आहे. कारमध्ये ७ एअरबॅग्स, इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी प्रोग्राम, ३६०-डिग्री कॅमेरा, ब्लाइंड व्ह्यू मॉनिटरिंग आणि आधुनिक ड्राइव्हर असिस्टेंट सिस्टम सारखे फीचर्स मिळतील. तर फ्रंटला कोलिजन वॉर्निंग, ऑटोमॅटिक इमर्जेंसी ब्रेकिंग, लेन कीप असिस्ट, लेन डिपार्चर वॉर्निंग, स्मार्ट पायलट असिस्ट सारखे फीचर्स मिळतील.
Tata Punch
सेफ्टी फीचर्सबाबत टाटाच्या कार देखील शानदार आहेत. Global NCAP ने कारला शानदार सेफ्टी फीचर्स दिले आहेत. अॅ[डल्टच्या सुरक्षेसाठी कारला ५ स्टार रेटिंग मिळाले आहे. तर लहान मुलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने ४ स्टार रेटिंग मिळाले आहे.
Mahindra XUV300
१० लाखांच्या बजेटमध्ये येणारी सुरक्षित कार शोधत असाल तर Mahindra XUV300 चांगला पर्याय आहे. ग्लोबल एनसीएपी क्रॅश टेस्टमध्ये ५-स्टार रेटिंग मिळालेली ही महिंद्राची पहिली कार आहे. गाडीला सेफर चॉइस अॅवॉर्ड देखील मिळाला आहे. महिंद्राच्या या गाडीमध्ये तुम्हाला अनेक शानदार सेफ्टी फीचर्ससह खरेदी करू शकता.
हेही वाचा: क्रेडिट कार्ड वापरताय...मग या गोष्टी माहिती हव्याच....

Tata Altroz
Tata Altroz
Tata Altroz ला देखील ग्लोबल एनसीएपी क्रॅश टेस्टमध्ये ५ स्टार रेटिंग मिळाले आहे. तर चाइल्ड ऑक्यूपेंट प्रोटेक्शनसाठी ३ स्टार रेटिंग मिळाले आहे. यात एबीएस, ट्रॅक्शन कंट्रोल, सेंट्रल लॉकिंग, ईबीडी, आयएसओफिक्स (चाइल्ड-सीट माउंट), २ एयरबॅग सारखे सेफ्टी फीचर्स दिले आहेत.
Tata Nexon
टाटा नेक्सॉन ही सध्या भारतात उपलब्ध असलेल्या सर्वात सुरक्षित कारपैकी एक आहे. एसयूव्हीला अॅडल्ट ऑक्यूपेंट प्रोटेक्शनसाठी ५ स्टार, तर लहान मुलांच्या सुरक्षेसाठी ३ स्टार रेटिंग मिळाले आहे. यामध्ये ड्यूल फ्रंट एयरबॅग्स, ABS ब्रेक्स आणि ISOFIX अँकरेज सारखे सेफ्टी फीचर्स मिळतील.