Year 2020 Google Search : कोरोना काळात लोकांनी काय केलं सर्वाधिक सर्च

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 9 December 2020

गुगल इंडियाने या वर्षीच्या 'ईअर इन सर्च'ची घोषणा केली आहे.

नवी दिल्ली : (Look back 2020) साल 2020 आता संपायला आलं आहे. आणि आता गुगल इंडियाने या वर्षीच्या 'ईअर इन सर्च'ची घोषणा केली आहे. म्हणजेच यावर्षी इंटरनेट वापरणाऱ्या लोकांनी सर्वांत जास्त काय सर्च केलं आहे याची घोषणा गुगलने केली आहे. यावर्षी ट्रेंडिंग सर्च टर्म्समध्ये जगभरात हाहाकार माजवणाऱ्या कोरोना व्हायरसचाच दबदबा राहिला आहे. टॉप ट्रेंड क्वेरीमध्ये आयपीएलच टॉपवर राहिलेलं आहे. अमेरिका, बिहार आणि दिल्ली निवडणुकांसाठी देखील खुप सर्चिंग करण्यात आलं आहे. अमेरिकेचे नवनिर्वचित राष्ट्राध्यक्ष जो बायडेन तसेच पत्रकार अर्णब गोस्वामी देखील टॉप ट्रेंडिंग पर्सनॅलिटीजमध्ये राहिले आहेत. तसेच प्रधानमंत्री किसान सम्मान निधी देखील टॉप ट्रेंडिंग चार्टमध्ये राहिलेलं आहे. 

जो बायडन आणि अर्णब गोस्वामीनंतर बॉलिवूड सिंगर कनिका कपूरबाबत लोकांनी सर्वाधिक सर्चिंग केलं आहे. बॉलिवूड मेगास्टार अमिताभ बच्चन, अभिनेत्री कंगना रनौत, रिया चक्रवर्ती आणि अंकिता लोखंडे देखील ट्रेंडिंग पर्सनॅलीटीमध्ये राहिल्या आहेत. इंटरनॅशनल सेलिब्रिटींमध्ये उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन, अफगाणिस्तानचे क्रिकेटर राशिद खान आणि अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष होणाऱ्या भारतीय वंशाच्या कमला हॅरिस देखील टॉप ट्रेंडिंग पर्सनॅलिटीजमध्ये राहिल्या आहेत.

हेही वाचा - तब्बल आठशे वर्षांनी गुरू-शनी ग्रहाची अनोखी युती पाहायला मिळणार
2020 ची टॉप ट्रेंडिंग मुव्ही दिल बेचारा देखील टॉप ट्रेंडमध्ये राहिली. त्यानंतर तमिळ ऍक्शन ड्रामा असलेली Soorarai Pottru टॉप ट्रेंडमध्ये राहिली. बॉलिवूडची बायोपिक मुव्ही तानाजी, शकुंतला देवी आणि गुंजन सक्सेना देखील टॉप 5 मध्ये राहिल्या. बॉलिवूड मुव्हीजमध्ये लक्ष्मी, बागी 3 आणि गुलाबो सिताबो यांचा दबदबा राहिला. वारंवार लॉकलाडून लागू करण्यात आल्यामुळे यावर्षी अनेक वेब सिरीज चर्चेत राहिल्या. यामध्ये मनी हेईस्ट पहिल्या स्थानावर आहे. त्यानंतर स्कॅम 1992 : द हर्षद मेहता स्टोरी, बिग बॉस 14 आणि मिर्झापूर 2 टॉपवर राहिली. प्रमुख न्यूज इव्हेंट्समध्ये आयपीएल, कोरोना व्हायरस आणि अमेरिकेच्या निवडणुकांना अधिक सर्च केलं गेलं. शिवाय आंतरराष्ट्रीय घटनांबाबत बोलायचं झालं ऑस्ट्रेलियाच्या जंगलाला लागलेल्या आगींविषयी सर्वाधिक सर्चिंग करण्यात आलं. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: know what people were searching during corona crisis lockdown google search year 2020