गर्लफ्रेंडचा मेसेज वाचायचा राहिलाय? व्हॉट्सअप देणार संपूर्ण लिस्ट | WhatsApp Features | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Whatsapp

WhatsApp Features: गर्लफ्रेंडचा मेसेज वाचायचा राहिलाय? व्हॉट्सअप देणार संपूर्ण लिस्ट

WhatsApp New Feature: इंस्टंट मेसेजिंग अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅप वापरणाऱ्यांची संख्या मोठी आहे. कंपनी देखील यूजर्सला शानदार चॅटिंग एक्सपीरियन्स मिळावा यासाठी अनेक नवनवीन फीचर्स आणत असते. असेच एक कामाचे फीचर चॅटमधील अनरिड मेसेज फिल्टर करणे आहे. या फीचरमुळे तुम्हाला आतापर्यंत न वाचलेले सर्व मेसेज एकाच क्लिकवर उपलब्ध होतील. WhatsApp unread messages कसे वाचू शकता, याविषयी जाणून घेऊया.

हेही वाचा - वाचा किस्से बँकेच्या लाॅकररुममध्ये घडलेले...एका बँक अधिकाऱ्याच्याच तोंडून

iPhone यूजर्स फॉलो करू शकतात ही प्रोसेस

  • सर्वात प्रथम फोनमध्ये व्हॉट्सअ‍ॅप ओपन करा.

  • आता सर्चबारमध्ये जा.

  • येथे सर्चबारच्या उजव्या बाजूला फिल्टर आयकॉन दिसेल.

  • या आयकॉनवर जाऊन बंदवर क्लिक करा.

अँड्राइड यूजर्स फॉलो करू शकतात ही प्रोसेस

  • सर्वात प्रथम तुमच्या अँड्राइड स्मार्टफोनमध्ये व्हॉट्सअ‍ॅप ओपन करा.

  • आता सर्चबारवर क्लिक करा. येथे तुम्हाला फोटो, व्हीडिओ, GIFs आणि अनरिडचा पर्याय दिसेल.

  • अनरिडवर क्लिक केल्यास तुम्हाला न वाचलेले सर्व मेसेज दिसतील.

वेबवरही शोधू शकत न वाचलेले मेसेज

  • यासाठी कॉम्प्युटरवर WhatsApp ओपन करा.

  • आता सर्च बारवर क्लिक करा.

  • येथे तुम्हाला फिल्टर आयकॉन दिसेल.

  • फिल्टर पर्याय बंद करण्यासाठी आयकॉनवर पुन्हा क्लिक करा.

दरम्यान, WhatsApp यूजर्ससाठी अनेक नवनवीन फीचर आणत असते. रिपोर्टनुसार, कंपनी आता दोन वेगवेगळ्या डिव्हाइसमध्ये व्हॉट्सअ‍ॅप अकाउंट वापरण्याची सुविधा देत आहे. कंपनी बीटा यूजर्सला स्मार्टफोनसह टॅबलेटमध्ये एकच अकाउंट वापरण्याची सुविधा देत आहे. बीटा यूजर्सला या संदर्भात मेसेज देखील दिसत आहेत. लवकरच हे फीचर सर्व यूजर्ससाठी रोल आउट होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Technologywhatsapp