Koo Update : 'कू ॲप'ला मिळाले 'हे' नवीन फीचर्स; जाणून घ्या सविस्तर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

koo app changes their look add new browsing experience service

Koo Update : 'कू ॲप'ला मिळाले 'हे' नवीन फीचर्स; जाणून घ्या सविस्तर

देसी बहुभाषिक मायक्रो-ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म 'कू'ॲप(Koo APP) मध्ये काही नवे बदल करण्यात आले आहेत. हे बदल iOS आणि Android दोन्ही वापरकर्त्यांना अधिक चांगला ब्राउझिंग अनुभव देण्यासाठी करण्यात आल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे. यामध्ये दिसायला आकर्षक , वापरण्यास सोपे आणि यूजर्सशी सहज कनेक्ट होईल असे हे डिझाइन वापरकर्त्यांना विशेष ध्यानात घेऊन बनवले गेले आहे. तसेच मागच्या आवृत्तीच्या तुलनेत यात एक महत्त्वाचे अपग्रेड म्हणजे यातील नव्या इंटरफेसमुळे App वापरताना नेव्हिगेशन अधिक सोपे होते. यातून यूजर्सना एक उत्कृष्ट आणि रिअल टाइम अनुभव मिळणार आहे.

'कू' ॲपचा नवा ब्राउझिंग एक्सपिरीएंन्समुळे हा यूजर इंटरफेसला खास ठरतो. या नव्या अपग्रेडमध्ये ॲपच्या डावीकडची रिकामी जागा काढून टाकली आहे. यातून कंटेंट आता एका कोपऱ्यापासून दुसऱ्या कोपऱ्यापर्यंत नीट दिसतो. यातून यूजर्सना त्यांच्या गरजेची माहिती पाहणं सोपे झाले आहे. यात अनावश्यक कंटेंटही कमी केला गेला आहे. परिणामी ॲप अगदीच स्वच्छ दिसते आणि यूजर एक्सपिरीएंस खूप जास्त सहज बनतो.

“यूजर्स आनंदी रहावे हाच आमच्या ब्रॅंडचा मुख्य हेतू असतो. विशेषकरून जेव्हा आमच्या यूजर इंटरफेसचा विषय येतो, तेव्हा आम्ही आपल्या यूजर्सना सर्वात उत्कृष्ट अनुभव देण्याबाबत सतत सजग असतो. या उत्कृष्ट ब्राउझिंग अनुभवाची सुरवात करून आम्ही एक चांगला बहुभाषिक मायक्रो-ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म बनण्याच्या दिशेने पाऊल उचलले आहे. याबाबत आम्हाला पूर्वीच कम्युनिटीकडून खूप चांगली प्रतिक्रिया मिळाली आहे. कू ॲपवर उत्कृष्ट ब्राउझिंग एक्सपिरीएंस देण्याच्या दिशेने केलेली ही केवळ सुरवात आहे." असे 'कू'चे डिझाइन हेड, प्रियांक शर्मा म्हणाले.

हेही वाचा: रस्त्यात चार्जिंग संपली, एकाने पेट्रोल ओतून जाळलं इलेक्ट्रिक स्कूटर

'कू' ॲप भारतात प्रादेशिक भाषांमध्ये अभिव्यक्त होण्यासाठी मोठा प्लॅटफॉर्म आहे. सध्या 'कू'वर युजर्सना मराठी, हिंदी, गुजराती, कन्नड़, तमिळ, बंगाली, असमिया, तेलुगू, पंजाबी आणि इंग्रजीत आपले विचार व्यक्त करता येतात. प्लॅटफॉर्म स्मार्ट फीचर्स लॉन्च करण्यासाठी सतत काम करत आहे. यातून यूजर्सच्या अनुभवांचा दर्जा वाढतो आणि त्यांना प्लॅटफॉर्मवर आधिकाधिक आनंद घेता येतो. 'कू'ने डार्क मोड, टॉक-टू-टाइप, चॅट रूम, लाइव्ह ही काही प्रमुख फीचर्स नुकतीच लॉन्च केली आहेत.

हेही वाचा: Nokia G21 स्मार्टफोन भारतात लॉन्च; जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

काय आहे कू?

'कू'ची स्थापना मार्च 2020 मध्ये भारतीय भाषांमधला बहुभाषिक मायक्रो-ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म म्हणून झाली. सध्या Koo मराठीसह इंग्रजी, हिंदी, गुजराती, कन्नड, तेलुगू, तमिळ, आसामी, पंजाबी आणि बंगाली अशा 10 भाषांमध्ये उपलब्ध आहे.

Koo ॲप वर तुम्ही आपले विचार मुक्तपणे व्यक्त करू शकता. ‘कू’च्या अनोख्या फीचर्स पैकी एक म्हणजे, भाषांतर सुविधा. हे फीचर मूळ मजकुरातली भावना आणि संदर्भ जसेच्या तसे राखत युजर्सना त्यांचा संदेश विविध भारतीय भाषांमध्ये अनुवादित करून पाठवण्याची रिअल टाइम सुविधा देते. नुकताच 'कू'ने 3 कोटीहून अधिक डाउनलोड्सचा टप्पा गाठला आहे. राजकारण, क्रीडा, माध्यम, कला, अध्यात्म या क्षेत्रातील 7 हजाराहून जास्त दिग्गज Koo च्या माध्यमातून आपल्या चाहत्यांशी नियमित संवाद साधत असतात.

हेही वाचा: twttr ते Twitter; जाणून घ्या कसा होता प्रवास?

Web Title: Koo App Changes Their Look Add New Browsing Experience Service

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Technology
go to top