Nokia G21 स्मार्टफोन भारतात लॉन्च; जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

nokia g21
nokia g21

नोकियाने मंगळवारी भारतात आपला नवीन G सीरीजचा स्मार्टफोन Nokia G21 लॉन्च केला. या फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप तसेच वॉटरड्रॉप-स्टाईल डिस्प्ले नॉच डिझाइन दिले आहे. फोन एका चार्जवर तीन दिवसांची बॅटरी लाइफ देण्याचा दावा करतो. त्यामुळे या नवीन Nokia G21 ची स्पर्धा Redmi Note 11, Realme 9i आणि Samsung Galaxy M32 शी होणार आहे.

भारतात, Nokia G21 च्या 4GB RAM + 64GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 12,999 रुपये आणि 6GB RAM + 128GB मॉडेलची किंमत 14,999 रुपये ठेवण्यात आली आहे. हा स्मार्टफोन डस्क आणि नॉर्डिक ब्लू कलर पर्यायांमध्ये येतो. ग्राहक हा फोन Nokia.com साइटवर, निवडक रिटेल स्टोअर्स आणि प्रमुख ई-कॉमर्स साइटवर खरेदी करू शकतात. नोकिया G21 खरेदी करणारे ग्राहक बजाज फिनसर्व्हच्या ट्रिपल झिरो फायनान्स ऑफरचा देखील लाभ घेऊ शकतात. HMD Global ने Nokia G21 सोबत नोकिया 105 (2022) आणि Nokia 105 Plus फीचर फोन, Nokia Comfort Earbuds आणि Go Earbuds + Truly Wireless Stereo (TWS) इयरबड्स देखील भारतात लॉन्च केले आहेत.

nokia g21
रस्त्यात चार्जिंग संपली, एकाने पेट्रोल ओतून जाळलं इलेक्ट्रिक स्कूटर

नोकिया G21 चे स्पेसिफिकेशन्स

Nokia G21 मध्ये 20:9 आस्पेक्ट रेशो 80Hz टच सॅम्पलिंग रेट, 90Hz रिफ्रेश रेट आणि 400nits पीक ब्राइटनेससह 6.5-इंचाचा HD+ (720x1,600 पिक्सेल) डिस्प्ले दिला आहे. फोन ऑक्टा-कोर Unisoc T606 प्रोसेसर वर चालतो, तसेच यामध्ये 6GB पर्यंत रॅम आणि 128GB पर्यंत ऑनबोर्ड स्टोरेज आहे. हे मायक्रोएसडी कार्डद्वारे 512GB पर्यंत वाढवता येऊ शकते. Nokia G21 मध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आहे ज्यामध्ये 50-मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, 2-मेगापिक्सेल मॅक्रो शूटर आणि 2-मेगापिक्सेल डेप्थ सेन्सरचा समावेश आहे. यात सेल्फी आणि व्हिडिओ चॅटसाठी 8-मेगापिक्सेल सेल्फी कॅमेरा सेन्सर देखील आहे.

nokia g21
'त्यांच्याकडं जातीचं अस्सल सर्टिफिकेट आहे, तरी..'; राणांना रोहित पवारांचा टोला

याशिवाय, Nokia G21 मध्ये साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर देखील आहे. हा फोन OZO स्पेशियल ऑडिओ कॅप्चर सपोर्टसह येतो आणि त्यात दोन मायक्रोफोन दिले आहेत. स्मार्टफोनमध्ये 18W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5,050mAh बॅटरी देखील आहे. त्याच वेळी, फोनची मापे ही 164.6x75.9 मिमी, जाडी 8.5 मिमी आणि वजन 190 ग्रॅम आहे.

nokia g21
मुंबईत 24 तासांत कोरोनाचे 102 नवे रुग्ण; फेब्रुवारीनंतर सर्वाधिक वाढ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com