
नवी दिल्ली, ता. २ (पीटीआय) ः प्रशांत महासागरात सप्टेंबरपासून ला निना परतण्याची शक्यता असून त्यामुळे हवामानावर परिणाम होऊ शकतो, असे जागतिक हवामान संघटनेने म्हटले आहे. तात्पुरत्या स्वरूपात वातावरण थंड करणाऱ्या ला निनामुळे यंदा मात्र जागतिक तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याचा अंदाजही वर्तविण्यात आला आहे.