Laptop Overheating : उन्हाळ्यात लॅपटॉप होतोय अधिक गरम? ब्लास्ट होऊ नये म्हणून अशी घ्या काळजी

तुमचा लॅपटॉप ओव्हरहीट होत असेल, तर त्यामागचं कारण जाणून घेणं सगळ्यात आवश्यक आहे.
Laptop Overheating
Laptop OverheatingeSakal

Laptop Overheating in Summer : उन्हाळ्यात इतर समस्यांसोबत दिसणारी एक मोठी समस्या म्हणजे लॅपटॉप किंवा कम्प्युटर ओव्हरहीट होणे. बहुतांश लोक याकडे दुर्लक्ष करतात. मात्र एरवी लॅपटॉप गरम होणे आणि उन्हाळ्यात लॅपटॉप गरम होणे यामध्ये भरपूर फरक असतो. त्यामुळे याकडे दुर्लक्ष करणं महागात पडू शकतं.

कारण जाणून घ्या

तुमचा लॅपटॉप ओव्हरहीट होत असेल, तर त्यामागचं कारण जाणून घेणं सगळ्यात आवश्यक आहे. कितीतरी जुन्या लॅपटॉपमध्ये फॅन खराब झाल्यामुळे ओव्हरहीटिंगची समस्या जाणवू शकते. तसंच, कूलिंग फॅनमध्ये धूळ साचल्यामुळे देखील लॅपटॉप अधिक गरम होऊ शकतो. या परिस्थितीमध्ये कूलिंग फॅन नीट केल्यास लॅपटॉप पुन्हा पहिल्यासारखा काम करू लागेल.

एअरफ्लो ठेवा सुरळीत

लॅपटॉपचं कूलिंग होण्यासाठी ठिकठिकाणी एअरफ्लो साठी जागा ठेवलेली असते. या ठिकाणी धूळ साचल्यामुळे बऱ्याच वेळा हवा खेळती राहण्यास अडचण येते. यामुळेच लॅपटॉपची नियमित स्वच्छता करणं गरजेचं आहे. जेणेकरुन एअरफ्लो व्यवस्थीत राहील आणि कूलिंग नीट होईल.

Laptop Overheating
Car Care : कारमधील एसी फॅनचा वेग वाढवल्यास मायलेज कमी होऊ शकते का? जाणून घ्या सविस्तर

योग्य ठिकाणी ठेवा लॅपटॉप

लॅपटॉप वापरताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, तो योग्य ठिकाणी ठेवणे. लॅपटॉप कुठेही नेता येत असल्यामुळे कित्येक जण बेडवर देखील तो घेऊन बसतात. मात्र अशा वेळी लॅपटॉप गादी, चादर किंवा उशीवर ठेवणं टाळावं. यामुळे लॅपटॉपला योग्य व्हेंटिलेशन मिळत नाही आणि तो अधिक गरम होतो. काही प्रकरणांमध्ये तर यामुळे आगीच्या घटनाही घडलेल्या आहेत. यामुळे लॅपटॉपला टेबलवर किंवा एखाद्या फ्लॅट सर्फेसवरच ठेवणं गरजेचं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com