
Indian Military : भारताने आपल्या संरक्षण क्षमता वाढवण्यासाठी हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) सोबत ₹६२,७०० कोटींचा करार केला आहे. या कराराअंतर्गत भारतीय हवाई दल आणि भारतीय लष्करासाठी १५६ हलके लढाऊ हेलिकॉप्टर (LCH) खरेदी केली जाणार आहेत. एलसीएच हे भारतातील पहिले स्वदेशी डिझाइन केलेले लढाऊ हेलिकॉप्टर आहे, जे ५,००० मीटरपेक्षा जास्त उंचीवर कार्य करू शकते. संरक्षण बळकटीसाठी भारताची हि मोठी उडी पाहायला मिळते.