64MP कॅमेऱ्यासह Oppo F21 Pro आणि F21 Pro 5G लॉंच; पाहा डिटेल्स

latest smartphone launch oppo f21 pro and oppo f21 pro 5g launches in india check price
latest smartphone launch oppo f21 pro and oppo f21 pro 5g launches in india check price
Updated on

Oppo F21 Pro आणि Oppo F21 Pro 5G स्मार्टफोन भारतात लॉन्च झाले आहेत. दोन्ही स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरे आणि 8GB रॅम सपोर्ट देण्यात आला आहे. फोनमध्ये 90Hz रिफ्रेश रेट सपोर्ट देण्यात आला आहे. फोनला Qualcomm Snapdragon 680 SoC चिपसेट ने सपोर्ट दिला आहे. तर Oppo F21 Pro 5G स्मार्टफोनमध्ये 60Hz स्क्रीन रिफ्रेश रेट सपोर्ट देण्यात आला आहे. फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 695 चिपसेट सपोर्ट याशिवाय Oppo Enco Air 2 लेटेस्ट ट्रू वायरलेस स्टिरिओ (TWS) इयरबड्स देण्यात आले आहेत.

Oppo F21 Pro ची किंमत

8GB रॅम 128GB - 22,999 रुपये

हा फोन कॉस्मिक ब्लॅक आणि सनसेट ऑरेंज कलर पर्यायांमध्ये येईल. हा फोन फायबरग्लास-लेदर डिझाइनमध्ये येईल.

Oppo F21 Pro 5G ची किंमत

8GB रॅम + 128GB - 26,999 रुपये

फोन कॉस्मिक ब्लॅक आणि रेनबो स्पेक्ट्रम शेड्ससह येतो.

तर Oppo Enco Air 2 Pro ची किंमत 3,499 रुपये आहे.

Oppo F21 Pro स्मार्टफोनची विक्री 15 एप्रिलपासून सुरू होणार आहे. Oppo F21 Pro 5G ची विक्री 21 एप्रिल 2022 पासून सुरू होईल. लॉन्च ऑफरमध्ये, Oppo F21 Pro आणि Oppo F21 Pro 5G स्मार्टफोन 10 टक्के बँक कॅशबॅक आणि नो-कॉस्ट EMI पर्याय खरेदी मिळेल.

latest smartphone launch oppo f21 pro and oppo f21 pro 5g launches in india check price
Oppo Enco Earbuds : कमी किंमतीत मिळते दमदार बॅटरी लाईफ, पाहा डिटेल्स

Oppo F21 Pro चे स्पेसिफिकेशन्स

Oppo F21 Pro स्मार्टफोन Android 12 आधारित ColorOS 12.1 वर काम करतो. फोनमध्ये 6.4-इंचाचा फुल एचडी प्लस एमोलेड डिस्प्ले दिला आहे. त्याची स्क्रीन रिझोल्यूशन 1,080x2,400 पिक्सेल आहे. फोनला 90Hz रिफ्रेश रेट सपोर्ट देण्यात आला आहे. फोनमध्ये 180Hz टच सॅम्पलिंग रेट मिळेल. तसेच ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 680 SoC चिपसेट सपोर्ट असेल . फोनमध्ये 8GB रॅम आहे. फोन ट्रिपल रियर कॅमेरा सह येतो. त्याचा मुख्य कॅमेरा 64 मेगापिक्सल्सचा आहे. तसेच 2 मेगापिक्सल मॅक्रो लेन्स आणि 2 मेगापिक्सल डेप्थ सेन्सर देण्यात आला आहे. सेल्फीसाठी फोनमध्ये 32-मेगापिक्सलचा Sony IMX709 कॅमेरा देण्यात आला आहे. Oppo F21 Pro मध्ये पॉवर बॅकअपसाठी 4,500mAh बॅटरी सपोर्ट आहे. फोनला 33W SuperVOOC फास्ट चार्जिंग सपोर्ट देखील मिळतो. फोनची जाडी 7.49mm आहे. हा फोन कॉस्मिक ब्लॅक कलर मध्ये येतो तर त्याचे वजन 175 ग्रॅम आहे.

latest smartphone launch oppo f21 pro and oppo f21 pro 5g launches in india check price
PHOTOS : येत्या काही दिवसात लॉन्च होणार 'या' 4 दमदार कार

Oppo F21 Pro 5G चे स्पेसिफिकेशन्स

Oppo F21 Pro 5G स्मार्टफोन Android 12 आधारित ColorOS 12 वर काम करतो. फोनमध्ये 6.4-इंचाचा फुल एचडी प्लस एमोलेड डिस्प्ले आणि रिफ्रेश रेट सपोर्ट 60Hz आहे आणि फोन ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 695 SoC चिपसेट सह येतो. फोनमध्ये 8GB रॅम ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळेल. फोनमध्ये 64 मुख्य कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. याशिवाय 2 मेगापिक्सल डेप्थ सेन्सर आणि 2 मेगापिक्सल मॅक्रो लेन्स देण्यात आली आहे. सेल्फीसाठी, Oppo F21 Pro 5G मध्ये 16-मेगापिक्सेल सेन्सर आहे. Oppo F21 Pro 5G मध्ये 4,500mAh बॅटरी आहे. ज्याला 33W SuperVOOC चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे. फोनची जाडी 7.49mm आहे. तर वजन 173 ग्रॅम आहे.

latest smartphone launch oppo f21 pro and oppo f21 pro 5g launches in india check price
३ मे पर्यंत मशिदींवरील भोंगे उतरवा अन्यथा…; राज ठाकरेंचा अल्टिमेटम

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com