
Oppo ने भारतात त्यांचे एअरबड्स Enco Air2 Pro लाँच केले आहेत. कंपनीने आपल्या लेटेस्ट बजेट स्मार्टफोन्स - Oppo F21 Pro आणि Oppo F21 Pro 5G सह इअरबड्सची घोषणा केली आहे. Oppo Enco Air2 Pro हा एक परवडणारा TWS इयरबड आहे आणि त्यात Active Noise Cancellation (ANC), 12.4mm ड्रायव्हर आणि बरेच फीचर्स दिले आहेत.
Oppo Enco Air2 Pro: किंमत आणि उपलब्धता
कंपनीचे लेटेस्ट TWS इयरबड्स Oppo च्या ऑनलाइन स्टोअर आणि मेनलाइन रिटेल आउटलेट्स वरून 3,499 रुपयांमध्ये खरेदीसाठी उपलब्ध असतील
Oppo Enco Air2 Pro: स्पेसिफिकेशन्स
Oppo Enco Air2 Pro मध्ये 12.4mm टायटॅनाइज्ड डायफ्राम ड्रायव्हर, कस्टम-मेड मोठा मागील चेंबर दिला आहे जो डीप बास आणि एकंदर संतुलित साऊंड इफेक्ट देतो. Enco Live Bass ट्यूनिंगसह काम करतो. इयरबड्स अॅक्टिव्ह नॉइज कॅन्सलेशनला सपोर्ट करतात जे कमी-फ्रिक्वेंसी साऊंड तसेच सभोवतालच्या हाय-फ्रिक्वेंसी आवाजाला कॅन्सल करण्याचा दावा करतात. इयरबड्स ट्रांसपरंसी मोडसह येतात. शिवाय, TWS इअरबड्स फास्ट चार्जिंगला देखील सपोर्ट करतात आणि दाव्यानुसार, 10-मिनिटांच्या चार्जमुळे 2 तास प्ले टाईम मिळेल.
कॉलिंगसाठी, यामध्ये Oppo ने AI नॉईज कॅन्सलेशनसह ड्युअल मायक्रोफोन दिले आहेत. इअरबड्सच्या इतर फीचर्समध्ये एन्को लाइव्ह इफेक्ट्स समाविष्ट आहेत ज्यात व्होकल बूस्ट आणि बास बूस्टचा समावेश आहे. बॅटरी लाईफबद्दल बोलायचे झाल्यास, Enco Air2 Pro ला चार्जिंग केससह एकूण 28 तासांची बॅटरी लाइफ ऑफर करण्यासाठी रेट केले जाते. कंपनीचा दावा आहे की हे इयरबड एका चार्जवर 7 तासांपर्यंत ऐकण्याचा वेळ देऊ शकतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.