Lava Agni 5G
Lava Agni 5GGoogle

Lava ने लॉंच केला देशातील पहिला स्वदेशी 5G स्मार्टफोन

दिग्गज मोबाइल कंपनी लावा इंटरनॅशनलने (Lava International) स्वदेशी नेक्स्ट जनरेशन 5G स्मार्टफोन लॉंच केला आहे. देशांतर्गत ग्राहकांसाठी 5G स्मार्टफोन लॉन्च करणारी ही पहिली स्वदेशी कंपनी ठरली आहे. लावाचा 5G स्मार्टफोन Lava Agni 5G भारतात विकसित केला गेला आहे आणि नोएडामध्ये बनवला गेला आहे.

या स्मार्टफोन मध्ये MediaTek चा नवीन 5G चिपसेट, 90 Hz डिस्प्ले आणि 64 मेगापिक्सेल क्वाड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. भारतीय बाजारपेठेत हा स्मार्टफोन Realme 8S 5G, Redmi Note 101 5G सारख्या स्मार्टफोनशी स्पर्धा करेल. लावा इंटरनॅशनलचे अध्यक्ष आणि व्यवसाय प्रमुख सुनील रैना यांनी सांगितले की, Dimensity 810 चिपसेटवर 5G स्मार्टफोन लॉन्च करणारी MediaTek ही दुसरी कंपनी आहे. रैनाच्या मते, चिनी ब्रँडच्या तुलनेत त्याची किंमत स्पर्धात्मक पातळीवर ठेवण्यात आली आहे. मीडियाटेक डायमेंशन 810 चिपसेट Realme 8s 5G मध्ये देखील वापरण्यात आला आहे.

करा दोन हजारांची बचत

लावाच्या या 5G स्मार्टफोनची किंमत 19,999 रुपये ठेवण्यात आली आहे. त्याची बुकिंग सुरू झाली असून जर तुम्ही हा स्मार्टफोन 17 नोव्हेंबरपूर्वी प्री-बुकिंग केला तर फक्त 17999 रुपये भरावे लागतील म्हणजेच थेट दोन हजार रुपयांची बचत होईल. या स्मार्टफोनच्या प्री-बुकिंगसाठी 500 रुपये आगाऊ भरावे लागतील. याचे प्री-बुकिंग लावाच्या अधिकृत साइटवर केले जाईल. त्याची विक्री 18 नोव्हेंबर रोजी दुपारी 12 वाजता सुरू होईल सोबतच कंपनीच्या वेबसाइटशिवाय फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉनवर हा फोन विक्रीसाठी उपलब्ध असेल. तसेच कंपनीच्या सर्व रिटेल आउटलेटवर विक्रीसाठी उपलब्ध असेल.

Lava Agni 5G
अँड्रॉइड फोनमध्ये फास्ट चार्जिंग होत नाहीये? फॉलो करा या टिप्स

Lava Agni 5G चे फीचर्स

कंपनीने हा फोन फक्त एकच व्हेरियंट 8 GB RAM + 128 GB इंटरनल मेमरी मध्ये लॉन्च केला आहे. अग्नि 5G ब्लू कलर व्हेरियंटमध्ये विकला जाईल.यात 6.78 इंच फुल एचडी प्लस आयपीएस पंच होल डिस्प्ले दिला आहे जो या सेगमेंटमध्ये सर्वात मोठा आहे. त्याचा रीफ्रेश दर 90 Hz असून स्क्रीन-टू-बॉडी रेशो 91.73 टक्के आहे. स्मार्टफोनच्या स्क्रीनला कॉर्निंग गोरिल्ला ग्लास प्रोटेक्शन देण्यात आले आहे.

या फोनमध्ये तुम्हाला 8 GB रॅम आणि 128 GB अंतर्गत स्टोरेज मिळेल.तसेच MediaTek 5G चिपसेट दिलेल्या या स्मार्टफोनमध्ये 64-मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, 5-मेगापिक्सलचा वाइड-एंगल कॅमेरा, 2-मेगापिक्सेल डेप्थ कॅमेरा आणि 2-मेगापिक्सेलचा मॅक्रो कॅमेरा दिला आहे. याशिवाय फ्रंट कॅमेरा 16 मेगापिक्सलचा आहे. Lava Agni 5G मध्ये 5000 mAh बॅटरी आणि खरेदीदारांना 30W चा सुपरफास्ट चार्जर मिळेल जो फोन फक्त 90 मिनिटांत पूर्णपणे चार्ज करेल. यात साइड-माउंट फिंगरप्रिंट सेन्सर आणि फेस अनलॉक फीचर दिले आहे. फेस अनलॉक फीचरद्वारे हा फोन केवळ 0.24 सेकंदात उघडता येऊ शकतो असा कंपनीचा दावा आहे.

Lava Agni 5G
सेकंड हँड कार खरेदी करताय? या गोष्टी ठेवा लक्षात

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com