esakal | Instagram अकाउंटमधील सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे असणारी फिचर्स जाणून घ्या

बोलून बातमी शोधा

instagram security}

Instagram, Facebook सोबत अशी अनेक ऍप लोकांच्या मनोरंजनासाठी नेहमी काहीतरी नवीन अपडेट्स आणत असतात

Instagram अकाउंटमधील सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे असणारी फिचर्स जाणून घ्या
sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम

औरंगाबाद: Instagram, Facebook सोबत अशी अनेक ऍप लोकांच्या मनोरंजनासाठी नेहमी काहीतरी नवीन अपडेट्स आणत असतात. तसेच ती वापरायला सोपी असल्याने त्यांच्या युजर्सची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. पण आता सर्वात महत्त्वाची काळजी आहे ती, सिक्यूरिटी आणि सेफ्टीची. या लेखात तुम्ही तुमचं सोशल मीडियाचे अकाउंट कसं सेफ ठेवाल याबद्दल जाणून घेऊया.

1. तुमचं अकाउंट प्रायव्हेट करा-
तुम्ही जर तुमचं इंस्टाग्राम अकाउंट प्रायव्हेट अकाउंट केलं तर तुमच्या पोस्ट कोण पाहू शकेल आणि कोण नाही हे तुम्ही नियंत्रित करू शकता.  प्रायव्हेट अकाउंटद्वारे तुम्ही ब्लॉक न करता कोणत्याही फॉलवरला काढून टाकू शकाल. प्रायव्हेट अकाउंट असल्यास कोणीही फॉलोवर नसलेला युजर तुमच्या परवानगीशिवाय तुमचा फोटो-व्हिडिओ किंवा रील्स पाहू शकत नाही.

भारतात PUBG मोबाईल यशस्वी होण्याचे ही आहेत कारणे

2. Two Factor Authentication-
टू-फॅक्टर ऑथेंटिकेशनद्वारे तुमच्या अकाउंटची सिक्यूरिटी वाढवू शकता. या फिचरमुळे तुम्ही जर तुमचं अकाउंट दुसऱ्या मोबाईलमध्ये उघडता तेंव्हा तुम्हाला एका SMS सिक्यूरिटी कोडची गरज असते. त्यामुळे तुम्ही तुमच्या अकाउंटचं Two Factor Authentication ऍक्टीव्हेट करून ठेवा.

3. तुमची स्टोरी जवळील मित्रांसोबत शेअर करा-
तुम्ही इंस्टाग्रामवर एक लिस्ट बनवू शकता आणि तुमची स्टोरी फक्त त्या लोकांनाच दिसू शकेल अशी सेटींगही करु शकता. तुम्ही या लिस्टमधून कुणालाही कधीही काढू शकाल किंवा ऍड करू शकाल. विशेष म्हणजे याची नोटीफिकेशनही दुसऱ्या युजरला जाणार नाही.

ट्विटरला पर्याय असलेल्या भारतीय बनावटीच्या Koo वर युजर्सचा डाटा धोक्यात

4. कमेंट फिल्टर करू शकता-
इंस्टाग्राम युजर्ससाठीला एक विशेष फिचरही मिळते त्यामध्ये तुम्ही कमेट फिल्टर लावू शकता. यामुळे बऱ्याच ऑफेंसिव कमेंट टाळू शकाल. या ऍपमध्ये असे अनेक फिचर आहेत जे वाईट शब्द ओळखून त्यांना काढून टाकू शकतं. तसेच तुम्ही कोणते इमोजी आणि शब्द नको असतील त्याची एक लिस्ट बनवू शकता.