हॅक न होणारी लॅंडिंग सिस्टिम!

वृत्तसंस्था
बुधवार, 21 डिसेंबर 2016

विमान अपहरण आणि हायजॅक होण्याचा धोका लक्षात घेऊन संशोधकांनी आता त्यावर उपाय शोधण्यास सुरू केले आहे. ऑस्ट्रेलियातील क्वीन्सलॅंड विद्यापीठातील"क्वीन्सलॅंड ब्रेन इन्स्टिट्यूटमधील संशोधकांच्या समूहाने मधशीपासून प्रेरित होऊन विमान उतरविण्याचे तंत्रज्ञान विकसित केले आहे. ही यंत्रणा पूर्णत: स्वयंचलित असेल आणि कधीही हॅक होणार नाही. मधमाशा आकाशातून खाली येताना "ऑप्टिक फ्लो' हे तंत्रज्ञान वापरतात व दिशेबरोबरच अंतराचाही अंदाज घेतात. यासाठी दोन्ही डोळ्यांचा उपयोग करतात. यापासून ेप्रेरणा घेऊन संशोधकांनी विमानाच्या समोरच्या कॅमेरे बसवले असून, सुरक्षित लॅंडिगसाठी विमान दृश्‍य सूचनांचा विचार करते.

विमान अपहरण आणि हायजॅक होण्याचा धोका लक्षात घेऊन संशोधकांनी आता त्यावर उपाय शोधण्यास सुरू केले आहे. ऑस्ट्रेलियातील क्वीन्सलॅंड विद्यापीठातील"क्वीन्सलॅंड ब्रेन इन्स्टिट्यूटमधील संशोधकांच्या समूहाने मधशीपासून प्रेरित होऊन विमान उतरविण्याचे तंत्रज्ञान विकसित केले आहे. ही यंत्रणा पूर्णत: स्वयंचलित असेल आणि कधीही हॅक होणार नाही. मधमाशा आकाशातून खाली येताना "ऑप्टिक फ्लो' हे तंत्रज्ञान वापरतात व दिशेबरोबरच अंतराचाही अंदाज घेतात. यासाठी दोन्ही डोळ्यांचा उपयोग करतात. यापासून ेप्रेरणा घेऊन संशोधकांनी विमानाच्या समोरच्या कॅमेरे बसवले असून, सुरक्षित लॅंडिगसाठी विमान दृश्‍य सूचनांचा विचार करते. ही स्वयंचलित यंत्रणा विमानाला लॅंडिंग दरम्यान वेग,उंची आणि दिशा नियंत्रित ठेवण्यासाठी मदत करते. याबाबत बोलताना,"" संशोधक साऊल थरोवगुड याईनी सांगितले, ""ही यंत्रणा इतर स्वयंचलित यंत्रणेपेक्षा खूप वेगळी असेल. आताची यंत्रणा लेसर-रेंज सेंसर्स, रेडिओ बिकन, जीपीएस सिग्नल अशा बाहेरच्या तंत्रावर अवलंबून आहे. या गोष्टींवर नियंत्रण मिळवून विमान हायजॅक करणे शक्‍य होत होते. कॅमेरावर आधारित तंत्रज्ञानामुळे हॅकिंग आणि हायजॅक होणे टाळता येऊ शकते.''


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Lending system that does not hacked!