MWC Lenovo Transparent Laptop : लिनोव्होने सादर केला चक्क पारदर्शक लॅपटॉप; कसा करतो काम? पाहा व्हिडिओ

Lenovo ThinkBook : या लॅपटॉपचा कीबोर्ड देखील टचस्क्रीनचा आहे. गरज भासल्यास संपूर्ण कीबोर्डचा पॅनल स्टायलसने वापरता येतो. याचा सर्वाधिक फायदा आर्टिस्ट लोकांना होणार आहे.
Lenovo Transparent Laptop
Lenovo Transparent LaptopeSakal

Lenovo Transparent Display Laptop at MWC 2024 : बार्सिलोनामध्ये सुरू असलेल्या मोबाईल वर्ल्ड काँग्रेसमध्ये एकाहून सरस टेक प्रॉडक्ट्स सादर करण्यात येत आहेत. यामध्येच लिनोव्होने चक्क पारदर्शक लॅपटॉप सादर केला आहे. या टेक फेस्टमध्ये हा लॅपटॉप आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे.

कसा आहे लॅपटॉप?

ThinkBook Transparent Display या लॅपटॉपला 17.3 इंच मोठी पारदर्शक स्क्रीन देण्यात आली आहे. या मायक्रो एलईडी डिस्प्लेमध्ये बेझल-लेस डिझाईन देण्यात आलंय. जेव्हा हा पॅनल सुरू केला जातो, तेव्हा त्यामध्ये 55 टक्के ट्रान्सपरन्सी देण्यात आली आहे. या लॅपटॉपचा कीबोर्ड देखील टचस्क्रीनचा आहे. गरज भासल्यास संपूर्ण कीबोर्डचा पॅनल स्टायलसने वापरता येतो.

लिनोव्होने म्हटलंय की या लॅपटॉपचा सर्वाधिक फायदा आर्टिस्ट लोकांना होणार आहे. समोर दिसणारी एखादी गोष्ट पारदर्शक स्क्रीनमधून देखील पाहता येत असल्यामुळे, कीबोर्ड स्क्रीनवर त्यांना अधिक चांगल्या प्रकारे स्केचिंग करता येईल. याव्यतिरिक्त एक स्टायलिश अन् आय-कॅचर लॅपटॉप म्हणून तर हा नक्कीच कामी येईल असंही कंपनीने म्हटलंय.

Lenovo Transparent Laptop
MWC Honor Magic 6 Pro : केवळ डोळ्यांनी कंट्रोल करता येणार कार; खास फीचर असणारा ऑनरचा स्मार्टफोन

किती प्रॅक्टिकल?

दिसायला आकर्षक असला, तरी हा लॅपटॉप वापरण्यासाठी तेवढा व्यवहार्य नसल्याचं कित्येक जण म्हणत आहेत. MWC मध्ये उपस्थित लोकांनी हा लॅपटॉप हाताळल्यानंतर अशी प्रतिक्रिया दिली आहे. या पारदर्शक स्क्रीनवर पारंपारिक लॅपटॉप एवढ्या प्रभावीपणे चित्रपट पाहता येईल का, टेक्स्ट वाचता येईल का? असे प्रश्न लोकांनी उपस्थित केले आहेत. यासोबतच कीबोर्डच्या जागीदेखील स्क्रीन असल्यामुळे, डिस्प्लेची लाईट त्यावर रिफ्लेक्ट होत असल्याची तक्रारही काही यूजर्सनी केली.

ही स्क्रीन किती मजबूत आहे याबाबत कंपनीने कितीही दावे केले असले, तरी डिस्प्ले आणि कीबोर्ड दोन्ही ठिकाणी स्क्रीन असल्यामुळे याच्या मजबूतीवर विश्वास बसणं कठीण असल्याचं मत लोकांनी व्यक्त केलं. एकूणच हा लॅपटॉप आकर्षक आहे, मात्र तेवढा प्रॅक्टिकल देखील आहे का याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे.

Lenovo Transparent Laptop
MWC 2024 : श्याओमीने मोबाईल वर्ल्ड काँग्रेसमध्ये लाँच केले दोन तगडे स्मार्टफोन; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com