लेट्यूसमधील आरोग्यवर्धक घटक रंगामुळेच!

वृत्तसंस्था
शुक्रवार, 9 डिसेंबर 2016

पाश्‍चिमात्यांच्या आहारात लेट्यूस ही पालेभाजी महत्त्वाचा भाग बनली आहे. मात्र सर्व प्रकारच्या लेट्यूस जातीमध्ये सारख्याच प्रमाणामध्ये अँटिऑक्‍सिडंटचे घटक नसतात.

पाश्‍चिमात्यांच्या आहारात लेट्यूस ही पालेभाजी महत्त्वाचा भाग बनली आहे. मात्र सर्व प्रकारच्या लेट्यूस जातीमध्ये सारख्याच प्रमाणामध्ये अँटिऑक्‍सिडंटचे घटक नसतात.
तसेच पानाच्या रंगावर त्यातील आरोग्यवर्धक गुणधर्माचा कार्यरत होण्याचा वेग अवलंबून असल्याचे "युनिव्हर्सिटी ऑफ दि बास्ककौंटी' येथील अभ्यासात दिसले. हे संशोधन"ऍग्रिकल्चरल अँड फूड केमिस्ट्री' या नियतकालिकात प्रकाशित झाले आहे. हिरव्या रंगाच्या लेट्यूसमधील अँटिऑक्‍सिडेंट लाल रंगाच्या लेट्यूसपेक्षा कमी वेगाने कार्यरत होत असल्याचे आढळले. संशोधकांनी लेट्यूसच्या हिरव्या पानांची बॅटाविया, लालसर पानांची मार्वल ऑफ फोर सीझन आणि लाल पानांची ओक लिफ या तीन जातीचे विश्‍लेषण केले. हिरव्या पानांच्या लेट्यूस पाण्यामध्ये मंद किंवा मध्यम गतीने कार्य करतात, तर लाल पानांतील मूलद्रव्ये मध्यम ते वेगाने कार्य करतात. डॉ. पेरेझ-लोपेझ यांनी सांगितले,""या
मूलद्रव्यांच्या वेगावरून त्यांच्या चांगल्या किंवा वाईटपणांचे निकष आखले जाऊ शकत नाहीत. मात्र त्यातून पदार्थापासून मिळालेल्या अन्नघटकांचा शरीरात मिसळले जाण्याचा वेग कळतो. कमी वेगाने आरोग्यवर्धक गुणधर्म मिसळल्यास अधिक काळापर्यंत घातक पदार्थांपासून सुरक्षा मिळते. त्यामुळे आहारात तिन्ही प्रकारच्या लेट्यूस भाज्या असल्यास आरोग्यासाठी अधिक फायदेशीर ठरेल.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Lettuce in the health component of the color attributed!

टॅग्स