ऐकण्यापेक्षा पाहण्याची "स्मरण'शक्ती अधिक!

वृत्तसंस्था
सोमवार, 5 डिसेंबर 2016

मनुष्याच्या स्मरणशक्तीबाबत सातत्याने संशोधन सुरू आहे. आपण ऐकण्यापेक्षा जे पाहतो, ते दीर्घकाळ स्मरणात राहत असल्याचे अमेरिकेतील इओव्हा विद्यापीठातील संशोधकांनी स्पष्ट केले आहे. संशोधन टीमचे प्रमुख जेम्स बि1/2लॉव्ह यांनी सांगितले, ""आपण प्रत्यक्षात जे पाहतो, ते ऐकण्यापेक्षा जास्त काळ स्मरणात राहते.

अभ्यासासाठी शंभर मुलांची सुमारे दीड महिना चाचणी घेतली असता ही गोष्ट जाणवली. कोणतीही गोष्ट स्मरणात ठेवण्यासाठी मेंदूमध्ये विशिष्ट रचना कार्यरत असते. प्रत्यक्षात पाहिलेल्या व ऐकत असलेल्या घटनांची मेंदू वेगवेगळ्या पद्धतीने नोंद घेतो. यामध्ये पाहिलेल्या घटनेचा परिणाम खूप काळ मनात विचार सुरू असल्याने दीर्घकाळ स्मरणात राहतो.

यातील दुसरा भाग म्हणजे कोणी काही सांगत असताना आपले त्याकडे पूर्ण क्षमतेने लक्ष असतेच असे नाही, घटना पाहताना मात्र मन, मेंदू दोन्ही एकत्रितरीत्या काम करतात. परिणामी लक्षात राहण्याचे प्रमाण जास्त असते. घटनेचा मनावर कसा परिणाम होतो, यावर तिचा स्मरणात ठेवण्याचा कालावधी ठरतो. यामुळेच काही घटना अल्प काळासाठी तर काही दीर्घकाळासाठी स्मरणात राहतात.''

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: To listen than to see the "remember" more power!

टॅग्स