esakal | पहिल्या एटीएमने गाठली पन्नाशी!
sakal

बोलून बातमी शोधा

पहिल्या एटीएमने गाठली पन्नाशी!

डिजिटल बॅंकिंग आणि कार्ड व्यवहार मागील काही वर्षांत मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. असे असले तरी लोकांच्या दैनंदिन जीवनात रोख रक्कम महत्त्वाची भूमिका बजावत आहे.
- राहिल अहमद, प्रमुख, ग्राहक विभाग, बार्कलेज्‌

पहिल्या एटीएमने गाठली पन्नाशी!

sakal_logo
By
वृत्तसंस्था

लंडनमध्ये सुवर्ण महोत्सव; सोनरी झळाळीसह पायघड्या घातल्या

लंडन : नागरिकांच्या पैसे काढण्याच्या पद्धतीत आमूलाग्र बदल करणाऱ्या "ऑटोमेटेड टेलर मशिन'चा (एटीएम) पन्नासावा वाढदिवस मंगळवारी साजरा करण्यात आला.

स्कॉटिश संशोधक शेफर्ड बॅरॉन यांनी एटीएमचा शोध लावला. बार्कलेज्‌ बॅंकेने प्रथम हे एटीएम सुरू केले. बार्कलेज्‌ बॅंकेकडून पहिल्यांदा सुरू झालेल्या एटीएमला आज सुवर्ण महोत्सवानिमित्त सोनेरी झळाळी देण्यात आली होती. उत्तर लंडनमध्ये एनफिल्ड येथे पहिले एटीएम 27 जून 1967 रोजी सुरू झाले. त्याचवेळी बॅंकेने आणखी सहा एटीएम सुरू केली. पहिल्या एटीएममधून पहिल्यांदा पैसे काढण्याचा मान ब्रिटिश विनोदी अभिनेते रेग वर्नी यांना मिळाला होता. त्या वेळी त्यांचा "ऑन द बसेस' हा कॉमेडी शो प्रसिद्धीच्या शिखरावर होता.

पहिल्या एटीएमच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त आज एटीएमला सुवर्णझळाळी देण्यासोबत एटीएमबाहेर सोनेरी फलकही लावण्यात आला होता. त्यासोबत ग्राहकांसाठी एटीएमबाहेर लाल पायघड्या अंथरण्यात आला होता. जगभरात आजघडीला सुमारे तीन कोटी एटीएम आहेत. यातील 70 हजार एटीएम ब्रिटनमध्ये असून, त्यातून 175 अब्ज पौंड 2016 मध्ये काढण्यात आले.

loading image