"माछिर जोल'' सॉंग ब्लॉग (व्हिडिओ)

वृत्तसंस्था
बुधवार, 10 ऑगस्ट 2016

सध्या सोशल मीडियासोबत ब्लॉगर्सचे लेखन प्रभावी आणि लोकप्रिय होत आहे. ब्लॉग हा सर्वसाधारणपणे एखाद्या संकेतस्थळावर वाचला जाणारा लेखन प्रकार आहे. मात्र या ब्लॉग प्रकाराचाही चेहरा मोहरा आता बदलत आहे. ब्लॉगमध्येही काही कल्पक पध्दतींचा अवलंब केला जातो.

पश्‍चिम बंगालमधील "सावन दत्त‘ यांनी ब्लॉगसाठी अनोखाच फंडा अवलंबला आहे. त्या स्वत: संगीतकार, गीतकार असून कोणताही विषय "सॉंग ब्लॉग‘मुळे प्रभावी ठरत आहे. या ब्लॉगसाठी त्यांनी दृक-श्राव्य माध्यमाचा वापर केल्याने कमीत कमी वेळात जास्तीत जास्त आशय पोहोचण्यास मदत होते.
सावन यांच्या सॉंग ब्लॉगमध्ये ऋतुबदल,बंगाली संस्कृतीच्या छटा, लोकांच्या जीवनातील छोट्या-छोट्या मजेदार गोष्टीवर त्यांनी सॉंग ब्लॉगमधून रंजनपणे मांडल्या आहेत. यामधील एक खुमासदार ब्लॉग म्हणजे "माछिर जोल‘ बंगाली सॉंग रेसिपी.

लिखित स्वरुपातील ब्लॉग आपल्याला नवीन नाहीत मात्र, सध्या फास्टफूड जनरेशनला जास्तीत जास्त माहिती रंजकपणे हवी असते. भल्या मोठ्या परिच्छेदांचे ब्लॉग वाचण्यापेक्षा दृकश्राव्य पध्दतीचा हा संगीतमय ब्लॉग चांगलाच लोकप्रिय ठरत आहे. सावन दत्त्त्त यांच्या सॉंग ब्लॉगचे वेगळेपण लक्षवेधी आहे.

सौजन्य : सावन दत्त यांच्या ब्लॉगवरून

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MACHER JHOL song blog

व्हिडीओ गॅलरी