आता स्वदेशी बनावटीची "फ्लाइंग टॅक्‍सी' 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 30 मे 2018

"आयआयटी कानपूर'चा संशोधनासाठी पुढाकार 

नवी दिल्ली : "उबर एअर' आणि अन्य परकी कंपन्या हवेत उडणाऱ्या टॅक्‍सी (एअर टॅक्‍सी) लॉंच करण्याच्या प्रयत्नात असताना देशातील काही युवा संशोधक स्वदेशी "फ्लाइंग टॅक्‍सी'च्या प्रकल्पावर काम करत आहेत. विशेष म्हणजे हवेत उडणाऱ्या या टॅक्‍सी पूर्णपणे स्वदेशी बनावटीच्या असतील. 2023 पर्यंत हा प्रकल्प तडीस नेण्याचा संशोधकांचा निर्धार आहे. 

देशातील प्रमुख महानगरांमध्ये वाहतुकीच्या समस्येने गंभीर रूप धारण केले असून, भविष्यामध्ये लोकसंख्यावाढीबरोबरच ही समस्यादेखील आणखी उग्र रूप धारण करू शकते. अशा स्थितीत हवेत उडणाऱ्या टॅक्‍सी दळणळणाचे प्रमुख साधन ठरू शकतात. "आयआयटी कानपूर'मधील संशोधकांनी यासाठी "व्हीटीओएल ऍव्हिएशन इंडिया' कंपनीसोबत यासाठी करार केला असून, पंधरा कोटी रुपयांचा हा करार आहे. याअन्वये आयआयटीमधील शंभर विद्यार्थी हवेत उडणाऱ्या टॅक्‍सीची निर्मिती करणार आहेत. भारतामध्ये "फ्लाइंग टॅक्‍सी'चे तंत्रज्ञान हे सध्या बाल्यावस्थेत आहे. 
 
वाहतुकीत बदल 
आगामी काही वर्षांमध्ये जागतिक पातळीवर दळणवळणाच्या साधनांमध्ये मोठी क्रांती होणार आहे. गुगल, एअर बस, उबर, वॉल्व्हो या आघाडीच्या कंपन्या सध्या चालकरहित टॅक्‍सीच्या निर्मितीवर काम करत आहेत. उबर एअर, ऍलन मस्कची बोरिंग कंपनी आणि "हायपरलूप वन'सारख्या कंपन्या एअर टॅक्‍सी आणि भूमिगत वाहतूक यंत्रणेच्या निर्मितीवर काम करत आहेत. फ्लाइंग टॅक्‍सी प्रत्यक्षात अवतरल्यानंतर वाहतूक क्षेत्राचा चेहरामोहराच बदलेल, असा संशोधकांचा दावा आहे. 

या संकल्पनेच्या विकासावर आम्ही काम करणार आहोत, तसेच नव्या तंत्रज्ञान क्षेत्राचीही ओळख करून घेण्याचा आमचा प्रयत्न राहील. येत्या वर्षापासून शंभरपेक्षाही अधिक विद्यार्थी या प्रकल्पावर काम करतील. 
अजय घोष, संशोधक, आयआयटी कानपूर 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: made in India "Flying Taxi"