maharashtra vehicle choice number selection online service
maharashtra vehicle choice number selection online serviceesakal

Vehicle Choice Number : घरबसल्या मिळवा वाहनांचा ‘चॉईस नंबर’! कालपासून सुरू झाली ऑनलाइन सुविधा, कशी कराल सोपी प्रोसेस? वाचा

maharashtra vehicle choice number selection online service : आपल्या वाहनाला आवडीचा क्रमांक (चॉईस नंबर) मिळवायचा, तर पूर्वी परिवहन विभागात चकरा मारायला लागत. आता वाहनधारकांना हा चॉईस नंबर घरबसल्या मिळवता येणार आहे.
Published on

Vehicle registration fancy number booking Maharashtra : आपल्या वाहनाला आवडीचा क्रमांक (चॉईस नंबर) मिळवायचा, तर पूर्वी परिवहन विभागात चकरा मारायला लागत. आता वाहनधारकांना हा चॉईस नंबर घरबसल्या मिळवता येणार आहे. राज्यात कालपासून ऑनलाईन सुविधेला सुरुवात झाली आहे. आवडीच्या क्रमांकातून वर्षाकाठी जिल्हा परिवहन विभागाला सात ते आठ कोटींचा लाभ होत असतो.

सांगली येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालय येथेही नव्या निर्णयाचा लाभ घेता येणार आहे. नव्याने वाहन नोंदणी होणाऱ्या वाहनांकरिता परिवहन विभागाने आवडीचा क्रमांक निवडण्याची सुविधा आता ऑनलाईन उपलब्ध करून दिली आहे. संपूर्ण राज्यात सोमवारी (ता. २५) या सुविधेला सुरुवात झाली आहे. नवीन वाहनांसाठी आवडीच्या क्रमांकाचे आरक्षण तसेच पैसे भरण्यासाठी वाहन खरेदी करणाऱ्यास परिवहन कार्यालयात फेऱ्या माराव्या लागणार नाहीत. आवडीचा क्रमांक मिळवण्यासाठी त्याची संकेतस्थळावर पडताळणी करून त्याचे आरक्षण आणि पैसे भरण्यासाठी कार्यालयात जावे लागत होते. आता ही सेवा पूर्णपणे फेसलेस करण्यात आली आहे.

maharashtra vehicle choice number selection online service
Sunita Williams : सुनिता विल्यम्सना अंतराळात सतावणाऱ्या 'त्या' घाण वासाचं रहस्य उलगडलं; अंतराळवीरांना श्वास घेणंही झालं होतं अवघड

...असा निवडा आवडीचा क्रमांक

fancy.parivahan.gov.in/fancy या संकेतस्थळावर जाऊन मोबाईल आणि ई-मेलच्या मदतीने ‘ओटीपी’ मिळवून नोंदणी करा

उपलब्ध असलेल्या आवडीच्या क्रमांकातून तुम्हाला हवा असलेला क्रमांक निवडा

क्रमांक निवडल्यानंतर त्याचे पैसे ऑनलाईन पेमेंट ‘गेट-वे’च्या मदतीने भरा

ई-पावतीची प्रिंट काढून वाहन विक्रेत्याकडे सादर करा

maharashtra vehicle choice number selection online service
Farmers Marriage Problem : शेतकरी नवरा नको गं बाई! ग्रामीण भागात कारभारीण मिळणं झालं कठीण, नेमकं प्रकरण काय?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com