
देशातील आघाडीची वाहन उत्पादक कंपनी महिंद्रा आणि महिंद्राने इलेक्ट्रिक एसयूव्ही ‘बीई ६ ई’ आणि ‘एक्सईव्ही ९ ई’ अशा दोन मोटारी भारतीय बाजारपेठेत दाखल केल्या आहेत. या दोन्ही मोटारी अत्याधुनिक इलेक्ट्रिक ओरिजिन आर्किटेक्चर इनग्लोवर आधारित असून, जगातील सर्वांत वेगवान ऑटोमोटिव्ह ‘माईंड एमएआयए’ने सुसज्ज आहेत. या मोटारींमधील नावीन्यपूर्णता आणि डिझाइन यांनी जागतिक पातळीवर नवे मापदंड प्रस्थापित केले आहेत, असे कंपनीने म्हटले आहे.