esakal | गूगल फोटो मध्ये असणारे तुमचे फोटो अँड्रॉइड फोन वर असे करा लाईव्ह वॉलपेपर

बोलून बातमी शोधा

Make your photos in Google Photos live wallpaper on Android phone tips marathi news}

गुगल फोटोच्या माध्यमातून तुम्ही त्यावर आलेल्या नव्या तुमचे  फोटो हे लाइव वॉलपेपर वर सेट करू शकता आणि एक वेगळा आनंद घेऊ शकता

sci-tech
गूगल फोटो मध्ये असणारे तुमचे फोटो अँड्रॉइड फोन वर असे करा लाईव्ह वॉलपेपर
sakal_logo
By
अर्चना बनगे

कोल्हापूर:  नव्या अँड्रॉइड मोबाईल मध्ये आता विविध सुविधा येऊ लागल्याआहेत. तुम्हाला असे नेहमीच वाटते की काही चांगले फोटो आपल्यासोबत नेहमीच असावेत. गुगल फोटोने तुमच्या मोबाइलच्या माध्यमातून काढलेले सर्व फोटो गुगल फोटोज मध्ये  संरक्षित करून ठेवते. यातील अनेक फोटो तुम्ही परसनालाईज्ड स्क्रीन सेव्हर किंवा पिक्चर ब्राउजर या सुविधेमध्ये ठेवू शकता. परंतु ही सुविधा Google  Nest Hub सारख्या निवडक स्मार्ट फोन मध्येच आहे. आता तुम्ही अँड्रॉइड स्मार्टफोन वर सुद्धा असे फोटो होम स्क्रीन किंवा लाईव्ह वॉलपेपर म्हणून ठेवू शकता.


गुगल फोटोज नेहमीच वारंवार अपडेट होत असतात. लेटेस्ट अपडेट च्या माध्यमातून तुम्ही मेमरीज सेक्शन मध्ये जाऊन लाइव वॉलपेपर सेट करू शकता. हे लाइव वॉलपेपर नंतर आपोआप अपडेट होत राहतात. परंतु ही सुविधा वापरण्यासाठी तुमच्याकडे गुगल फोटोज व्हर्जन 5.22 असणे जरुरी आहे. जर तुमच्याकडे हे नवीन व्हर्जन नसेल तर प्ले स्टोअर मध्ये जाऊन तुम्ही हे ॲप अपडेट करू शकता.तुमचा फोन अपडेट झाला की खालील प्रमाणे सोप्या कृती करा आणि तुमच्या मोबाईल मध्ये गुगल फोटोज मधील अनेक तुमचे आवडते फोटो स्क्रीनसेवर ठेवा.

हेही वाचा- तुमचं फेसबुक प्रोफाइल कोण चेक करतयं का ? जाणून घ्या -
 
* फोन च्या  Home Screen वर जावा आणि स्क्रीन वर   लॉन्ग-प्रेस करा 

* नंतर स्क्रीन वर  ‘Home Settings’, ‘Widgets’ आणि  ‘Styles & Wallpapers' असे ऑप्शन दिसतील. 

*  ‘Styles & Wallpapers’ वर  क्लिक करा आणि  और स्क्रॉल डाउन करून  Live wallpapers वरती जावा.

*Google Photosमधिल फोटो  लाइव वॉलपेपर साठी सिलेक्ट करण्यासाठी‘Memories’ निवडा