या सिस्टीमच्या कामाबाबत मंगेश यांनी सांगितले, इलेक्ट्रॉनिक्स इंडस्ट्रीमध्ये प्रिंटेड सर्किटमधील बिघाड शोधण्यासाठी या सिस्टीमची मदत होणार आहे.
-संतोष मिठारी
कोल्हापूर : स्मार्ट फोन, टी. व्ही., लॅपटॉप, डिजिटल स्क्रीन अशा विविध इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंमध्ये डिजिटल सर्किट (Digital Circuit) महत्त्वाचा घटक असतो. त्यामध्ये काही बिघाड निर्माण झाल्यास तो शोधण्यात बराच वेळ जातो. ते टाळण्यासाठी कऱ्हाडमधील रेठरे फॅक्टरी परिसरातील मंगेश गिरीश इस्लामपूरकर (Mangesh Islampurkar) यांनी संबंधित बिघाड काही क्षणात अचूकपणे ओळखणारी सेमीकंडक्टर तंत्रज्ञान वापरून ‘फॉल्ट डायग्नोसिस सिस्टीम’ तयार केली आहे. त्याच्या वापराने या सर्किटच्या दुरुस्तीचा वेग वाढणार आहे.