
मेटाने 23 वर्षीय मनोज टूमू यांना 3.6 कोटींची नोकरी ऑफर दिली.
याच्याकडे कोणती खास कौशल्ये आहेत यावर जगभर चर्चा होतेय
चला तर मग मनोजबद्दल जाणून घेऊया सविस्तर..
Manoj Toomu Meta Job : मेटाने 23 वर्षीय भारतीय वंशाच्या सॉफ्टवेअर इंजिनीअर मनोज टूमू यांना तब्बल 3.6 कोटी रुपयांचे (400,000 डॉलर्स) पॅकेज देऊन नोकरीची संधी दिली आहे. वयाच्या अवघ्या 23व्या वर्षी इतके मोठे यश मिळवणाऱ्या मनोज यांनी आपल्या यशाचे रहस्य उलगडले आहे. मेटाच्या जाहिरात संशोधन टीममध्ये मशीन लर्निंग सॉफ्टवेअर इंजिनीअर म्हणून काम करणाऱ्या मनोज यांनी यापूर्वी अमेझॉनमध्ये आपली कौशल्ये सिद्ध केली होती.