फेसबुक व्हॉइस क्‍लिपचे नवे फीचर भारतात

वृत्तसंस्था
रविवार, 4 मार्च 2018

मुंबई : फेसबुकमार्फत एड व्हॉइस क्‍लिप या नवीन फीचरची भारतात चाचपणी सुरू आहे. स्टेट्‌स अपडेटच्या मॅसेज कम्पोझिंग मेन्यूमध्ये हे फीचर दिसणार आहे. फेसबुक वापरकर्त्यांना छोटी ऑडिओ क्‍लिप रेकॉर्ड करण्याची सुविधा यामुळे मिळेल.

महत्त्वाचे म्हणजे भारतीय वापरकर्त्यांनाच हे फीचर वापरण्यासाठी मिळाले आहे. टाइप करण्याला पर्याय म्हणून या व्हॉइस क्‍लिपचा वापर होईल. जगभरात टायपिंगमध्ये येणाऱ्या अडचणी लक्षाच घेऊन फेसबुकने स्टेट्‌स अपडेटसाठी या फीचरची निर्मिती केली आहे.

आपल्या स्थानिक भाषेतील की बोर्ड नसल्यामुळेच यूजर्सना स्टेट्‌स अपडेट करण्यात अडचणी येतात. या फीचरच्या माध्यमातून वापरकर्त्यांना व्यक्त होण्यासाठी एक नवे माध्यम मिळेल, असे फेसबुकचे म्हणणे आहे. 

या फीचरअंतर्गत अलोहा आणि फिओना हे मॉडेल विकसित करण्यात येत आहे. त्यामध्ये व्हॉइस कमांडवर आधारित वापरकर्त्याची ओळख असेल. त्यासोबतच फेसबुकने चेहऱ्याद्वारे ओळखीवर आधारित लॉग इनचे मॉडेल विकसित करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news Facebook voice clip