esakal | राउटर,लॅपटाप,फोनचा वायफाय पासवर्ड कसा बदलायचा,जाणून घ्या सोपी प्रक्रिया
sakal

बोलून बातमी शोधा

WiFi connection

राउटर,लॅपटाॅप,फोनचा वायफाय पासवर्ड कसा बदलायचा,जाणून घ्या सोपी प्रक्रिया

sakal_logo
By
भूषण श्रीखंडे

जळगाव ः कोरोनामुळे (corona) सद्या अनेक जण घरातून अन्य ठिकाणांवरून कार्यालयांचे (office) काम करत आहे. तसेच आॅनलाईन क्लासेस (Online classes) व शाळेतून विद्यार्थ्यांचे शिक्षण (Online learning) घेत आहे. त्यामुळे अनेकांनी घरात वायफाय कनेक्शन (WiFi connection) बसविले असून काही जाणांकडून तुमच्या वायफाचा पासवर्ड चोरून आपला डाटा चोरी केला जात आहे. त्यामुळे तुमच्या वायफाय राउटरचा संकेतशब्द (पासवर्ड) बदलण्याची अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला मार्ग सांगणार आहोत.

(laptop pc mobile wifi password change process)

हेही वाचा: काळोख्या रात्रीचा थरार..कुटूंब गाढ झोपेत आणि मांजर-नागाची झुंज

कसा बदलायचा पासवर्ड

तुमच्या घरात डी-लिंक किंवा टीपी-लिंक आदी राऊटर असल्यास तुम्हाला फक्त आयपी अॅडरेस (पत्ता) आवश्य आहे. यासाठी तुमच्या स्मार्टफोन, लॅपटाॅप किंवा संगणकावर ब्राऊझर उघडता. या प्रकारानंतर शोध बारमधील आयपी पत्ता आपले डिव्हाईस, समान वायफाय शी कनेक्ट केलेले असल्याचे तपासा. आपल्याकडे पत्ता नसल्यास सेवा प्रदात्याची (कस्टमर केअर) मदत घेवू शकतात.

या व्यतिरिक्त शोध बारमध्ये 192.168.1.1 किंवा 192.168.0.1 टाईप करा. यानंतर आपण वायफाय राउटर अंतर्गत लिहिलेला संकेतशब्द घेवू शकता. कुणीही बदलला नसल्यास सामान्य प्रशासन केलेला संकेतशब्द युजरॅडमिन असतो.

हेही वाचा: भावी पत्नी, सासूला घरी सोडले, थोड्यावेळात आली अपघाताची बातमी

यानंतर तुम्हाला तुमचा जुना पासवर्ड दिसेल. यासह आपल्याला नवीन संकेतशब्द जतन करण्याचा पर्याय मिळेल. त्यात नवीन संकेतशब्द टाईप केल्यानंतर तुम्ही सेव करण्याचे बटण दाबा.

WiFi connection

WiFi connection

यानंतर घरातील सर्व साधने वायफाय राउटरवर डिस्कनेक्ट केली जातील, जे आपण नवीन संकेतशब्द टाईप करून पुन्हा जोडू शकतात. या दरम्यान डेटा चोरी करीत असलेला व्यक्ती त्यानंतर तो डेटा चोरी करू शकत नाही.

हेही वाचा: नंदुरबारच्या अनिलकडून युरोपातील ‘माउंट एल्ब्रूस’ सर

वायफाय पासवर्ड कसा शोधायचा..

तुम्ही तुमच्या वायफायचा पासवर्ड शब्द विसरला असल्याच तुमचा तुमचा पासर्वड कसा शोधायचा याची सोपी माहिती सांगणार आहोत. यामुळे २० सेकंदांपेक्षा कमी वेळात वायफाय संकेतशब्द शोधू शकता. संगणक किंवा लॅपटाॅप उघडा. यानंतर संगणाकाच्या पॅनलवर जावून जिथे तुम्हाला नेटवर्क आणि शेअरींग सेंटरचा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा. यानंतर आपण ज्या वायफाय शी कनेक्टेड आहात त्याचे नाव दिसेल त्यावर क्लिक करा. त्यानंतर वायरेल प्राॅपर्टीवर क्लिक करा. त्यानतंर सिक्युरिटीच्या आॅप्शनवर क्लिक करून स्क्रीनवर शो कॅरेक्टर असलेल्या बाॅक्सवर क्लिक करा. या नंतर बिंदू आणि दिसणे सुरू होईल. जे वायफायचा संकेतशब्द (पासवर्ड) आहे.

loading image