पुढील वर्षी भूकंपाचे जोरदार धक्के बसणार? 

वृत्तसंस्था
शुक्रवार, 24 नोव्हेंबर 2017

भूकंपाबाबत कधीच अंदाज वर्तविता येत नसल्याने ही जगाच्या इतिहासात आतापर्यंत सर्वाधिक विध्वंस करणारी नैसर्गिक आपत्ती ठरली आहे. पुढील वर्षी जगभरात भूकंपांचे प्रमाण वाढेल, अशी भीती शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे. पृथ्वीच्या गतीमध्ये होत असलेले बदल या भूकंपांमागील मुख्य कारण असेल, असा शास्त्रज्ञांचा अंदाज आहे. 

अर्थात, भूकंप होण्यापूर्वी त्याचा इशारा देणे अद्याप शक्‍य झालेले नाही. आतापर्यंतच्या भूकंपांच्या वेळी असलेली भौगोलिक स्थिती, भूगर्भात होत असलेली हालचाल आणि त्यावरून वातावरणात होत असलेले बदल यावरून शास्त्रज्ञांनी हा अंदाज वर्तविला आहे. 

पृथ्वीची गती मंदावत असल्याने 2018 मध्ये जगभरात भूकंपांचे प्रमाण वाढू शकेल, अशा शास्त्रज्ञांचा अंदाज आहे. गेल्या आठवड्यात वर्तविलेल्या या अंदाजामुळे जगभरातील भूकंपप्रवण क्षेत्रांतील रहिवाशांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. पृथ्वीच्या गतीतील बदल आणि भूकंपांचे प्रमाण यातील परस्परसंबंध शास्त्रज्ञांनी सिद्ध केला आहे. गेल्या शंभर वर्षांहून अधिक काळातील नोंदींच्या अभ्यासानंतर त्यांनी हा निष्कर्ष काढला आहे. पुढील वर्षी किमान 20 विध्वंसकारक भूकंप होतील, असा या अभ्यासा निष्कर्ष आहे. 

'भूकंपांचे प्रमाण वाढले, तर त्यापुढील काळात भूकंपापूर्वीच त्याचा अंदाज वर्तविणे शक्‍य होईल', अशी शक्‍यता कोलोरॅडो विद्यापीठातील शास्रज्ञांनी वर्तविली आहे. यासंदर्भातील अभ्यास त्यांनी अमेरिकी भूगर्भशास्त्र संस्थेच्या वार्षिक बैठकीमध्ये सादर केला. 

'भूगर्भातील आणि पर्यावरणातील काही घटकांचा प्रत्यक्ष भूकंपावर परिणाम होत असतो; पण हे घटक अद्याप अज्ञात आहेत', असेही शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. दर काही दशकांनी पाच ते सहा वर्षांसाठी पृथ्वीची गती नैसर्गिकरित्या मंदावते. अर्थात, 'पृथ्वीच्या मंदावलेल्या गतीचा आणि भूकंपांचा परस्परसंबंध आहे' हे गृहितक पूर्णपणे स्वीकारण्यास काही भूगर्भशास्त्रज्ञांनी नकार दिला आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news marathi websites Scientists Predict Earthquakes in 2018