काय आहे नवीन OnePlus 5T फोनमध्ये?

Friday, 17 November 2017

OnePlus 5T ची वैशिष्ट्ये

 • 6 इंचाचा एचडी ऑप्टीक एमोलेड डिस्प्ले
 • गोरिला ग्लास प्रोटेक्शन
 • ऑक्टा कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 835 प्रोसेसर
 • 16 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा
 • 20 मेगापिक्सल रिअर कॅमेरा
 • 3300 mAH क्षमतेची बॅटरी
 • फेस अनलॉक फिचर

OnePlus 5 नंतर जवळपास पाच महिन्यांनी OnePlus 5T हा स्मार्ट फोन काल (गुरुवार) लाँच करण्यात आला. काही दिवसांपूर्वी या फोनचे फिचर्स लिक झाले होते व तेव्हापासून हा फोन लाँच कधी होणार याची उत्सुकता होती. भारतात हा फोन 21 नोव्हेंबरपासून अॅमेझॉन वर विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे.

OnePlus 5 प्रमाणेच हा नविन फोन 6 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज तसेच 8 जीबी रॅम व 128 जीबी स्टोरेज अशा दोन प्रकारात उपलब्ध असणार आहे. यापैकी 64 जीबीच्या फोनची किंमत 32999 रुपये तर 128 जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत 37999 रुपये असणार आहे.

या फोनमध्ये फेस अनलॉक, सनलाइट डिस्प्ले फिचर यांचा समावेश करण्यात आला आहे. तसेच फिंगरप्रिंट सेन्सर फोनच्या मागच्या बाजूला देण्यात आले आहे. 

OnePlus 5T ची वैशिष्ट्ये

 • 6 इंचाचा एचडी ऑप्टीक एमोलेड डिस्प्ले
 • गोरिला ग्लास प्रोटेक्शन
 • ऑक्टा कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 835 प्रोसेसर
 • 16 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा
 • 20 मेगापिक्सल रिअर कॅमेरा
 • 3300 mAH क्षमतेची बॅटरी
 • फेस अनलॉक फिचर

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news mobile phone news in marathi OnePlus 5T announced