इलेक्ट्रिक 'रोडस्टर' धावणार ताशी 400 च्या स्पीडने!

शुक्रवार, 17 नोव्हेंबर 2017

इलेक्ट्रिक कार बनविणाऱया 'टेस्ला' कंपनीने जगातील सर्वाधिक वेगवान 'रोडस्टर' कार गुरूवारी रात्री लॉस एंजलिसमध्ये सादर केली. या कारचा वेग ताशी 402 किमी प्रति तास इतका असल्याचा दावा 'टेस्ला'चे मुख्य कार्यकारी अधिकारी एलॉन मस्क यांनी केला आहे. 

'रोडस्टर'ला शुन्य ते साठ किलोमीटरपर्यंतचा वेग घेण्यासाठी अवघे 1.9 सेकंद लागतात. शुन्य ते 100 किलोमीटरपर्यंतचा वेग घेण्यासाठी 'रोडस्टार'ला 4.2 सेकंद पुरतात. हायवेवर सुमारे हजार किलोमीटरच्या प्रवासासाठी पुरेल इतकी 200 किलोवॅटची बॅटरी 'रोडस्टर'ला आहे. 

'रोडस्टर' स्पोर्टस् कार आहे. 2-2 अशी चार जणांसाठीची आसनव्यवस्था कारमध्ये आहे. या कारची प्रत्यक्ष विक्री 2020 पासून सुरू होईल. त्यावेळी बाजारात कारची किंमत सुमारे सव्वा कोटींहून थोडी अधिक असेल. त्या आधी फाऊंडर सेरिज म्हणून या कारची विक्री सुरू होईल. या सेरिजमध्ये हजार कार विकल्या जातील. सुमारे 1 कोटी 62 लाख रुपये इतकी या सेरिजच्या कारची विक्री किंमत आहे. 

लॉस एंजलिसमधील कार्यक्रमात 'टेस्ला'ने इलेक्ट्रिक ट्रकही सादर केला. इलेक्ट्रिक ट्रक आणि बसेस बनविण्याच्या 'टेस्ला'च्या उपक्रमातील हा सर्वात महत्वाचा टप्पा मानला जात आहे. 2019 पासून ट्रकच्या प्रत्यक्ष उत्पादनास प्रारंभ होणार आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Marathi news science technology news in Marathi Tesla Roadster