सर्वांत प्राचीन जीव स्पंज नव्हे, जेली 

वृत्तसंस्था
बुधवार, 12 एप्रिल 2017

न्यूयॉर्क : पृथ्वीवरील जीवसृष्टीची सर्वांत प्राचीन शाखा कोणती, या प्रश्‍नाचे उत्तर शोधल्याचा दावा येथील जीवशास्त्रज्ञांच्या एका गटाने केला आहे. त्यानुसार, जीवसृष्टीची सुरवात स्पंज (पाणी शोषणारे जलचर) या शाखेपासून नाही, तर कोम्ब जेली या सागरी प्राण्याच्या शाखेपासून झाल्याचे या शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.   

उत्क्रांतीच्या सध्याच्या टप्प्यावर असलेल्या प्राण्यांमधील मज्जासंस्था, पचनसंस्था आणि अवयव कसे विकसित झाले, याचा माग काढण्यासाठी जीवसृष्टीची सुरवात झाली त्या प्राणिशाखेची माहिती मिळणे शास्त्रज्ञांच्या दृष्टीने आवश्‍यक होते. या विषयावर विस्कॉन्सिन-मॅडिसन विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी संशोधन केले. त्यांचे हे संशोधन "नेचर इकॉलॉजी अँड इव्हॉल्यूशन' या नियतकालिकामध्ये प्रसिद्ध झाले आहे. यासाठी त्यांनी वादग्रस्त ठरलेल्या आणि मान्यताप्राप्त अशा 17 "फॅमिली ट्री'चा अभ्यास केला. आतापर्यंत विविध प्राण्यांमधील वैशिष्ट्यांवरून त्यांची मूळ शाखा ठरविली जात असे.

तुलनात्मकदृष्ट्या साध्या रचनेमुळे स्पंज हीच प्राचीन प्राणिशाखा असल्याचे मानले जात होते. मात्र, नंतरच्या काही काळामध्ये विविध प्राण्यांच्या जनुकांचा अभ्यास केल्यानंतर या गृहीतकाबाबत संशय व्यक्त केला जाऊ लागला. 2008 मध्ये संशोधकांच्या एका गटाने कोम्ब जेली (क्‍टेनोफोर) हीच मूळ प्राणी शाखा असल्याचा दावा केल्यानंतर अनेक जणांनी सखोल अभ्यास सुरू केला. 

विस्कॉन्सिन-मॅडिसन विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी अनेक प्राण्यांच्या जनुकांचा गेली काही वर्षे अभ्यास केला आणि त्यांच्यामध्ये परस्परसंबंध निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी काढलेल्या निष्कर्षानुसार, कोम्ब जेली हीच मूळ प्राणिशाखा आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Marine jellies were the earliest animals: study