Maruti Baleno लवकरच येतेय नव्या अवतारात; काय असतील फीचर्स?

Maruti Baleno
Maruti Baleno

मारुती सुझुकीची भारतातील बेस्ट सेलिंग कार्स प्रीमियम हॅचबॅक मारुती सुझुकी बलेनो लवकरच नवीन मारुती बलेनो (New Maruti Baleno) नावाने नव्या अवतारात येत आहे. गेल्या 6 वर्षांपासून भारतीय कार बाजारात जोरदार मागणी असूनही, मारुती सुझुकी बलेनो हा प्रीमियम हॅचबॅक सेगमेंटमध्ये अपडेट नसलेले वाहन आहे. मात्र आता लवकरच मारुती बलेनो गाडीला पहिले आणि मोठे अपडेट मिळणार आहे. या नव्या अपडेटचे फोटो सध्या इंटरनेटवर पाहिले जात आहे आहेत.

डिझाइनमध्ये महत्त्वपूर्ण बदल

एका चॅनेलद्वारे YouTube वर अपलोड केलेल्या व्हिडिओमध्ये कारची टेस्ट म्युल समोर आले होते ज्यामध्ये बलेनोची सुधारित आवृत्ती समोर आली. दरम्यान या मध्ये नवीन मारुती सुझुकी बलेनोमध्ये होणारे सर्व बदल दाखवण्यात आले आहेत. या प्रीमियम हॅचबॅकच्या नवीन आवृत्तीला समोरील बाजूस मोठ्या ग्रिल आणि स्लिक हेडलॅम्पसह संपूर्ण रीडिझाइन करण्यात आले आहे. ज्यामध्ये एलईडी प्रोजेक्टर आणि शार्प दिसणारे डे-टाईम एलईडी देण्यात आले आहेत.

समोर आलेल्या या व्हिडिओमध्ये नवीन मारुती सुझुकी बलेनोच्या केबिनबद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाही. मागील स्पाय शॉट्समध्ये पाहिल्याप्रमाणे, नवीन आवृत्तीचा डॅशबोर्ड नवीन लेआउटने बदलला जाईल. यात इन्स्ट्रुमेंट कन्सोलसाठी टीएफटी डिस्प्ले, नवीन फ्री-स्टँडिंग टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आणि नवीन लोअर सेंटर कन्सोल मिळेल.

Maruti Baleno
Maruti Celerio कारचे बुकिंग सुरु; देईल देशातील सर्वाधिक मायलेज

इंजिन

इंजिन संदर्भात बोलायचे झाल्यास, नवीन बलेनोला स्विफ्ट पेक्षा नवीन 1.2-लिटर चार-सिलेंडर नॅचरली एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन मिळण्याची अपेक्षा आहे, जे 90 PS पॉवर आणि 113 Nm चे टॉर्क आउटपुट जनरेट करेल. या इंजिनसह, कंपनी 5-स्पीड मॅन्युअल आणि CVT युनिटचा समावेश देखील करु शकते.

Maruti Baleno
पुढच्या आठवड्यात येतेय Hyundai Creta; काय असतील नवीन फीचर्स?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com