

Maruti Brezza Earns Top 5-Star Safety Rating in Bharat NCAP
esakal
Maruti Suzuki Brezza: भारतीय ऑटोमोबाइल मार्केटमध्ये मायलेजचा बादशाह म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मारुती सुझुकीने आता सुरक्षेच्या बाबतीतही एक मोठा धमाका केला आहे. मध्यंतरीच्या काळात ग्राहकांमध्ये वाहनांच्या मजबुतीबद्दल प्रचंड जागरूकता निर्माण झाली होती.
याच बदलत्या काळाची पावले ओळखून कंपनीने आपल्या एका अत्यंत लोकप्रिय गाडीला एका नव्या आणि अत्यंत मजबूत रूपात सादर करण्याची तयारी केली आहे. ही केवळ दिसायलाच देखणी नाही, तर सुरक्षेच्या बाबतीतही आता लोखंडी भिंत बनली आहे.