
New GST Slab: केंद्र सरकार लहान गाड्यांवरचा जीएसटी (GST) २८% वरून १८% पर्यंत कमी करण्याच्या तयारीत आहे. या दिवाळीत सरकार अनेक वस्तूंवरील जीएसटी कमी करण्याची योजना आखत आहे, ज्यात लहान गाड्यांचाही समावेश आहे. सध्या या गाड्यांवर २८% जीएसटी आणि १% सेस, म्हणजेच एकूण २९% कर लागतो. पण, जर तो १८% पर्यंत कमी केला, तर ग्राहकांना थेट १०% फायदा मिळेल. उदाहरणार्थ,
जर एखाद्या गाडीची एक्स-फॅक्टरी किंमत ५ लाख रुपये असेल, तर २९% कर जोडल्यावर ती ६.४५ लाख रुपये होते. परंतु जीएसटी १८% झाल्यावर किंमत फक्त ५.९० लाख रुपये राहील. म्हणजेच, खरेदीदाराची सुमारे ५५,००० रुपयांची बचत होईल. त्याचप्रमाणे, १० लाख रुपयांच्या गाडीवर सुमारे १.१० लाख रुपयांपर्यंत बचत होऊ शकते.