
मारुतीची नवीन स्वस्त SUV लॉंच, किंमत पाहून होईल विकत घेण्याची इच्छा
प्रतीक्षा संपवत मारुती सुझुकीने आज ग्रँड विटारा मध्यम आकाराच्या एसयूव्हीच्या किमती जाहीर केल्या आहेत. त्याची किंमत 10.45 लाख (एक्स-शोरूम) पासून सुरू असून ती 19.49 लाख रुपयांपर्यंत जाते. आता या किंमतीसह या कारची स्पर्धा Hyundai Creta आणि Kia Seltos शी होईल. मारुती सुझुकी ग्रँड विटारा सिग्मा, डेल्टा, झेटा, अल्फा, झेटा+ आणि अल्फा+ यासह सहा व्हेरिएंट आणि कलर ऑप्शन्ससह नेक्सा ब्लू, आर्क्टिक व्हाइट, स्प्लिंडिड सिल्व्हर, ग्रँडियर ग्रे, चेस्टनट ब्राउन, ऑप्युलंट रेड, ब्लॅक रूफसह आर्क्टिक व्हाइट, ब्लॅक यासह स्पे्लेंडिड सिल्वर आणि ब्लॅक रुफ आणि ऑप्युलंट रेड हे पर्याय उपलब्ध असणार आहेत.
नवीन मारुती सुझुकी ग्रँड विटाराचे व्हेरिएंट्स आणि किंमती (सर्व किंमती एक्स-शोरूम)
हायब्रिड सिग्मा एमटी: 10.45 लाख रुपये
हायब्रिड डेल्टा एमटी: 11.90 लाख रुपये
हायब्रिड डेल्टा AT: 13.40 लाख रुपये
हायब्रिड झेटा एमटी: 13.89 लाख रुपये
हायब्रिड झेटा AT: 15.39 लाख रुपये
हायब्रिड अल्फा एमटी: 15.39 लाख रुपये
हायब्रिड अल्फा एटी: 16.89 लाख रुपये
हायब्रिड अल्फा एमटी AWD: 16.89 लाख रुपये
मारुती सुझुकी ग्रँड विटारा इंटेलिजेंट इलेक्ट्रिक हायब्रिड झेटा+ ECVT: 17.99 लाख रुपये
मारुती सुझुकी ग्रँड विटारा इंटेलिजेंट इलेक्ट्रिक हायब्रिड अल्फा+ ECVT: 19.49 लाख रुपये
हेही वाचा: पुणे : भिडे पुलाजवळ ३५ वर्षीय व्यक्तीचा खून, नदी पात्रात आढळला मृतदेह
ग्रँड विटाराचे फीचर्स
मारुती सुझुकी ग्रँड विटारामध्ये पॅनोरामिक सनरूफ, हेड्स-अप डिस्प्ले, वायरलेस चार्जर, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, 360-डिग्री पार्किंग कॅमेरा, अॅम्बियंट लाइटिंग, फ्रंट व्हेंटिलेटेड सीट्स, कीलेस एंट्री, रियर एसी व्हेंट्स, इंजिन स्टार्ट/ स्टॉपसाठी पुश बटन, यूएसबी पोर्ट, 9-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, अँड्रॉइड ऑटो आणि Apple कारप्ले सपोर्ट देण्यात आला आहे. कारमध्ये यासारखी अनेक फीचर्स देण्यात आली आहेत.
हेही वाचा: आता iPhone 14 देखील असेल 'मेड इन इंडिया', भारतात सुरू झालं उत्पादन
ग्रँड विटारा इंजिन
मारुती सुझुकी आणि टोयोटा या दोन्ही कंपन्यांनी एकत्रितपणे हायरायडर आणि ग्रँड विटारा विकसित केली आहे. हायरायडरप्रमाणे, ग्रँड विटारामध्ये माइल्ड-हायब्रीड पॉवरट्रेन दिली आहे. हे 1462cc K15 इंजिन आहे जे 6,000 RPM वर सुमारे 100 bhp पॉवर आणि 4400 RPM वर 135 Nm टॉर्क जनरेट करते. याला माइल्ड हायब्रिड सिस्टीम मिळते आणि ती 5-स्पीड मॅन्युअल किंवा 6-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिकशी जोडली जाते. ही पॉवरट्रेन आजपर्यंत AWD पर्याय असलेले एकमेव इंजिन आहे.