Maruti-Suzuki Cars : मारुतीच्या ग्राहकांना मोठा दणका; परत मागवल्या तब्बल १६ हजार गाड्या.. कोणत्या मॉडेल्सचा समावेश?

Suzuki Baleno Called back : या मोटारींच्या इंधन पंपमध्ये दोष असण्याची शक्यता आहे, ज्यामुळे क्वचित प्रसंगी इंजिन अचानक बंद पडण्याची किंवा इंजिन सुरू होताना समस्या येऊ शकते, असं कंपनीने स्पष्ट केलं आहे.
Maruti-Suzuki Cars
Maruti-Suzuki CarseSakal

Maruti-Suzuki Cars Called Back : भारतातील सगळ्यात मोठी कार कंपनी असणाऱ्या मारुती-सुझूकीने आपल्या ग्राहकांना धक्का दिला आहे. कंपनीने आपल्या सुमारे १६ हजार गाड्या परत मागवल्या आहेत. सदोष इंजिन पंपमुळे या गाड्या परत मागवल्या असल्याचं कंपनीने स्पष्ट केलं आहे.

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, बलेनो (Baleno) आणि वॅगनआर (WagonR) या गाड्यांच्या इंजिन पंपमध्ये काही त्रुटी आढळल्या आहेत. त्यामुळे या गाड्या परत मागवण्यात आल्या आहेत. ३० जुलै २०१९ ते एक नोव्हेंबर २०१९ दरम्यान तयार झालेल्या ११,८५१ बलेनो मोटारी आणि ४,१९० वॅगन आर मोटारी कंपनी परत मागवत आहे, असे कंपनीने नियामकाला दिलेल्या माहितीत म्हटले आहे. (Maruti Cars Called Back)

कधीही बंद पडू शकतं इंजिन

या मोटारींच्या इंधन पंपमध्ये दोष असण्याची शक्यता आहे, ज्यामुळे क्वचित प्रसंगी इंजिन अचानक बंद पडण्याची किंवा इंजिन सुरू होताना समस्या येऊ शकते, असं कंपनीने स्पष्ट केलं आहे. यामुळेच ग्राहकांनी स्वतःच पुढे येत या गाड्यांचा पार्ट बदलून घ्यावा असं आवाहन कंपनीने केलं आहे. (Maruti-Suzuki Cars Fault)

Maruti-Suzuki Cars
Bajaj CNG Bike : बजाजच्या 'सीएनजी' दुचाकीची चाचणी सुरू; डिझाईन अन् मायलेज डीटेल्स लीक

मोफत होणार काम

हा सदोष भाग बदलण्यासाठी वाहन मालकांशी अधिकृत वितरकांद्वारे संपर्क साधला जाईल आणि योग्य वेळेत, विनामूल्य दुरुस्ती करून दिली जाईल, असे कंपनीने स्पष्ट केले आहे. यासाठी ग्राहकांना केवळ आपल्या जवळच्या सर्व्हिस सेंटरला भेट द्यावी लागेल. यानंतर ग्राहकांना मोफत हा भाग बदलून मिळेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com