मारुती कारप्रेमींसाठी धक्कादायक बातमी, सुरक्षेबाबत आली मोठी अपडेट | Maruti Cars | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Maruti Cars

Maruti Cars: मारुती कारप्रेमींसाठी धक्कादायक बातमी, सुरक्षेबाबत आली मोठी अपडेट

Maruti Suzuki Safety Rating: मारुती सुझुकी (Maruti Suzuki) ही देशातील सर्वाधिक कार विक्री करणारी कंपनी आहे. कंपनीच्या वाहनांना भारतीय ग्राहकांकडून जबरदस्त प्रतिसाद मिळतो. सुरक्षेच्या दृष्टीने देखील कंपनीच्या वाहनात चांगले फीचर्स मिळतात. परंतु, आता मारुती सुझुकीच्या तीन गाड्या क्रॅश टेस्टमध्ये फेल झाल्या आहेत. यामध्ये मारुती सुझुकी स्विफ्ट, मारुती सुझुकी इग्निस आणि मारुती सुझुकी एस-प्रेसोचा समावेश आहे.

Global NCAP क्रॅश टेस्टमध्ये या कार्सला फक्त १ स्टार रेटिंग मिळाले आहे. अ‍ॅडल्ट ऑक्यूपेंट प्रोटेक्शन आणि चाइल्ड ऑक्यूपेंट प्रोटेक्शन कॅटगरीमध्ये स्विफ्टला १ स्टार, तर इग्निस आणि एस-प्रेसोला शून्य स्टार मिळाला आहे.

स्विफ्टच्या क्रॅश टेस्टमध्ये चालक आणि प्रवाशाची मान आणि डोके सुरक्षित असल्याचे आढळले. परंतु, अपघातात छाती सुरक्षित राहत नसल्याचे समोर आले आहे. स्विफ्टला अ‍ॅडल्ट ऑक्यूपेंट प्रोटेक्शनमध्ये ३४ पैकी १९.१९ पॉइंट्स आणि १ स्टार मिळाला आहे. चाइल्ड ऑक्यूपेंट प्रोटेक्शन कॅटगरीमध्ये ४९ पैकी १६.६८ पॉइंट्स आणि शून्य स्टार मिळाले आहेत.

हे ही वाचा : सीमावादात रक्त सांडायला मराठी माणूसच का?

Maruti Ignis देखील टेस्टमध्ये अपयशी

Maruti Ignis ला अ‍ॅडल्ट ऑक्यूपेंट प्रोटेक्शनमध्ये ३४ पैकी १६.४८ पॉइंट्स आणि १ स्टार मिळाला आहे. क्रॅश टेस्टमध्ये प्रवाशांची मान आणि डोके सुरक्षित होते. परंतु, चालकाच्या छातीला दुखापत होण्याची शक्यता समोर आली. चाइल्ड ऑक्युपेंट प्रोटेक्शनमध्ये कारला ४९ पैकी ३.८६ पॉइंट्स आणि शून्य स्टार रेटिंग मिळाले आहे.

हेही वाचा: Live Location: तुमची गर्लफ्रेंड या क्षणी काय करतीये? जाणून घ्या ट्रॅक करण्याची सोपी ट्रिक

Maruti S-Presso ला मिळाले शून्य स्टार

मारुती एस-प्रेसोला अ‍ॅडल्ट ऑक्यूपेंट प्रोटेक्शनमध्ये ३४ पैकी २०.३ पॉइंट्स आणि १ स्टार रेटिंग मिळाले आहे. कारच्या क्रॅश टेस्टमध्ये चालक आणि प्रवाशांची मान आणि डोके सुरक्षित असल्याचे आढळले. परंतु, चालकाच्या छातीला इजा होऊ शकते, असे समोर आले आहे. चाइल्ड ऑक्यूपेंट प्रोटेक्शन कॅटेगरीमध्ये कारला ४९ पैकी ३.५२ पॉइंट्स आणि शून्य स्टार रेटिंग दिले आहे.