Maruti Suzuki Grand :अधिक आकर्षक डिझाईनसह येणार ‘SUV ग्रँड विटारा’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Maruti Suzuki Grand Vitara

Maruti Suzuki Grand : अधिक आकर्षक डिझाईनसह येणार ‘SUV ग्रँड विटारा’

मारुती सुझुकी ही देशातील सर्वात मोठ्या लोकप्रिय कार उत्पादक कंपनीपैकी एक आहे. कंपनी अनेक जुन्या मॉडेल्ससोबतच अत्याधुनिक सुविधा असलेली मॉडेल्स या वाहनप्रेमींमध्ये उत्सुकतेचा विषय ठरत असतो. कंपनीच्या प्लॅनमध्ये अनेक नवीन कार लॉन्च करण्याची तयारी सुरू आहे. अलीकडेच, कंपनीच्या नवीन सबकॉम्पॅक्ट ‘एसयूव्ही ग्रँड विटारा २०२२’च्या (Maruti Suzuki Grand Vitara २०२२) सिग्मा प्रकाराचा पहिला लूक संपूर्ण फिचरसह समोर आला आहे. केवळ बाह्यच नव्हे तर आतील भागातीलही कारची झलक पाहायला मिळाल्याने या कारबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे नवीन ‘ग्रँड विटारा’ १५ प्रकारांमध्ये असणार आहे.

नवीन कारच्या सिग्मा व्हेरिएंटमध्ये बॉडी कलर, दरवाजाच्या हँडल्ससह १७-इंच स्टीलच्या चाकांचा समावेश करण्यात आला आहे. एलईडी टेललाईटस्‌ आणि बॅजदेखील मागील बाजूस बसविले आहेत. इंटीरियरबद्दल बोलायचे झाल्यास या कारमध्ये ब्लॅक आणि मरून थीमची केबिन बसवली गेली आहे. या मूळ प्रकारात प्लास्टिक हाउसिंग डॅशबोर्ड आणि फॅब्रिक सीटस्‌ वापरण्यात आल्याचे दिसत आहे.

या कारच्या फिचर्सबद्दल बोलायचे तर, या प्रकारात स्टार्ट-पुश बटण, ड्युअल फ्रंट एअरबॅग्ज, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी प्रोग्राम, रिअर पर्किंग सेन्सर, स्टेयरिंग माउंटेड ऑडिओ आणि कॉलिंग कंट्रोल यांचा समावेश आहे. कारला लिटरचे इंजिन मिळेल, की जे पॉवर आणि टॉर्क जनरेट करेल. तसेच, या प्रकारात ५-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन मिळेल.

‘मारुती ग्रँड विटारा’ची एक्स शो रूम किंमत १०.४५ लाखांपासून ते १९.६५ लाखापर्यंत आहे.