Maruti Suzuki News : मारुतीने परत मागवले 'या' कारचे 11 हजारांहून अधिक युनिट्स; काय आहे तांत्रिक बिघाड? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

maruti suzuki

Maruti Suzuki News : मारुतीने परत मागवले 'या' कारचे 11 हजारांहून अधिक युनिट्स; काय आहे तांत्रिक बिघाड?

देशातील आघाडीची ऑटोमोबाईल कंपनी मारुती सुझुकी इंडिया (MSI) ने आपल्या SUV मॉडेल Grand Vitara चे 11,177 युनिट्स परत मागवण्याची घोषणा केली आहे. या गाडीत काही तांत्रिक बिघाड दूर करण्यासाठी कंपनीकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.

हा आहे तांत्रिक बिघाड

कंपनीने सांगितले की, या गाडीच्या मागील सीट बेल्टमधील काही तांत्रिक त्रुटी दूर करण्यासाठी ही वाहने परत मागवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रभावित युनिट्स 8 ऑगस्ट 2022 ते 15 नोव्हेंबर 2022 दरम्यान तयार करण्यात आली होती.

ग्रँड विटाराच्या या युनिट्सवरील मागील सीट बेल्ट ब्रॅकेट भविष्यात सैल होण्याची शक्यता आहे. हा दोष दूर करण्यासाठी ही वाहने परत मागवून दुरुस्त करण्यात येणार आहेत.

हेही वाचा: Beed News : 'त्याचा' बाजार उठला! फेसबुकवर बघून बैलजोडी मागवली अन् 95 हजारांना बुडाला

यासंदर्भात कंपनीकडून वाहनधारकांना अधिकृत डीलर वर्कशॉपमध्ये आणण्यासाठी माहिती दिली जाईल. तेथे बाधित भागाची तपासणी करून मोफत बदलण्यात येईल. मारुतीने गेल्या आठवड्यात त्याच्या इतर काही मॉडेल्सच्या 17,362 युनिट्स परत मागवण्याची घोषणा केली होती. 8 डिसेंबर 2022 ते 12 जानेवारी 2023 दरम्यान बनवलेल्या या वाहनांचे एअरबॅग कंट्रोलर बदलण्यात येणार आहेत.

हेही वाचा: युपीतला सेक्युरिटी गार्ड अन् पाकिस्तानी तरुणीचं ऑनलाईन प्रेम; नेपाळमध्ये लग्नही केलं, पण नशीब…

टॅग्स :Automobilemaruti suzuki