esakal | मारुतीची Wagon R आता येणार इलेक्ट्रिक मॉडेलमध्येही; टेस्टिंगच्या वेळी दिसली झलक
sakal

बोलून बातमी शोधा

मारुतीची Wagon R आता येणार इलेक्ट्रिक मॉडेलमध्येही; टेस्टिंगच्या वेळी दिसली झलक

मारुतीची Wagon R आता येणार इलेक्ट्रिक मॉडेलमध्येही; टेस्टिंगच्या वेळी दिसली झलक

sakal_logo
By
अथर्व महांकाळ

मारुती सुझुकी वॅगन आर (Maruti Suzuki Wagon R) ही भारतातील सर्वाधिक लोकप्रिय हॅचबॅक कार आहे. मध्यमवर्गीय कुटुंबात वॅगनआरला सर्वाधिक मागणी आहे. आता लवकरच वॅगनआरचा नवा लूक समोर येणार आहे. नवीन वॅगनआर इलेक्ट्रिक (electric Car) वॅगनआर असणार आहे. आज आम्ही तुम्हाला याच कारचे काही फीचर्स सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया. (Maruti Suzuki Wagon R electric seen during testing)

हेही वाचा: सोशल मीडिया खरंच पूर्णपणे बंद झाला तर? कसं असणार त्यानंतरचं जग

आता टोयोटा मारुती वॅगनआरला एका नवीन अवतारात सादर करणार आहे. टोयोटाच्या नवीन वॅगन आरची नुकतीच टेस्टिंग घेण्यात आली. यादरम्यान या कारच्या फीचर्सबद्दल माहिती मिळाली आहे. इलेक्ट्रिक वॅगनआरच्या लुक्समध्ये अनेक बदल आहेत.तसंच ही इलेक्ट्रिक कार कंपनी कोणत्या नावानं बाजारात येईल याबद्दल माहिती मिळू शकली नाही.

कारच्या टायर्सवर टोयोटाची ब्रांडिंग देण्यात आली आहे. टोयोटाने कारच्या बाह्यभागात बरेच बदल केले आहेत. तसंच कारच्या फ्रंट लुक्सलाही अजून स्टायलिश करण्यात आलंय. फ्रंट आणि रियर बंपर्सना यात अजून आकर्षक बनवण्यात आलंय.

हेही वाचा: अखेर मलिंगा हत्याकांड उघडकीस; डीएनए चाचणीवरून लागला शोध

टोयोटाच्या वॅगनआर मधील इंजिन माहित झाले नाही. सध्याच्या वॅगनआरला 1.0-लिटर आणि 1.2-लिटर असे दोन इंजिन पर्याय आहेत.पेट्रोल व्यतिरिक्त वॅगनआर सीएनजीमध्येही उपलब्ध आहे. यापूर्वी टोयोटाने टोयोटा ग्लान्झा या नावाने मारुती बलेनोची ओळख करून दिली आहे. टोयोटा ग्लान्झा बलेनोसारखीच दिसते.

(Maruti Suzuki Wagon R electric seen during testing)