अखेर मलिंगा हत्याकांड उघडकीस; डीएनए चाचणीवरून लागला शोध

अखेर मलिंगा हत्याकांड उघडकीस; डीएनए चाचणीवरून लागला शोध

नागपूर ः एमआयडीसीतील मलिंगा नावाच्या मुलाचे अपहरण करून खून करण्यात आला होता. या हत्याकांडाचा छडा लावण्यासाठी डीएनए टेस्ट (DNA Testing) केली होती. त्यावरून पोलिसांनी बिहारमधून दोन आरोपींना अटक केली असून त्यांची पाच दिवसांची पोलिस कोठडी घेतली.. हे हत्याकांड दिड वर्षींपूर्वी घडले होते. ( 2 people arrested in Malinga death case in nagpur)

अखेर मलिंगा हत्याकांड उघडकीस; डीएनए चाचणीवरून लागला शोध
नागपूरकरांनो, संपूर्ण अनलॉक नाहीच! वाचा काय असणार सेवांची नवीन वेळ

दिनेश उर्फ मलिंगा शंकर पासवान (१७, रा. आयसी चौक, हिंगणा रोड) असे मृताचे नाव असून चंदन उर्फ छोटा घी शिवपूजन शाह (१९) कार्तिकनगर झोपडपट्टी झोन चौक आणि कुणाल उर्फ कॉकरोच राजगिरी प्रसाद (१९) भीमनगर अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. कुंदन उर्फ मोठा घी शिवपूजन शाह (२१) हा मृत झाला आहे.

दिनेश आणि आरोपी हे बिहार राज्यातील राहणारे आहेत. कामधंद्यासाठी ते नागपूरला आले होते. हातमजुरी करून ते आपला उदरनिर्वाह करीत असत. त्यातच दिनेश हा गरम डोक्याचा होता. घटनेच्या काही दिवसांपूर्वी दिनेशने चंदन यास तलवारीने मारले होते. त्यामुळे आरोपी त्याच्यावर टपून होते. २१ डिसेंबर २०१९ बाजारात जाऊन येतो असे घरच्यांना सांगून तो बाहेर निघून गेला होता. आरोपींना ही माहिती समजताच त्यांनी दिनेशला गाठले.

त्याचा मेट्रो स्थानकाच्या मागील पहाडीवर नेऊन गळा दाबून खून केला. त्याचठिकाणी खड्डा खोदून दिनेशचा मृतदेह पुरला. इकडे दिनेश घरी न आल्याने कुटुंबियांनी त्याचा शोध घेतला. तो कुठेही मिळून न आल्याने ९ जानेवारी २०२० साली पोलिसात तक्रार करण्यात आली. पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.

असा लागला सुगावा

१६ जानेवारी रोजी पहाडीवर एक कवटी, हाडाचे तुकडे, चार दात आणि काही कपड्यांचे तुकडे मिळून आले होते. हाडे ही मानवी असल्याचा निर्वाळा अ‍ॅनाटॉमी विभागाने दिल्याने पोलिसांनी तपासाला गती दिली. सदरची हाडे ही अपहृत मुलगा दिनेशचे असावेत असा संशय पोलिसांच्या मनात आला. पोलिसांनी ११ जानेवारी २०२१ रोजी दिनेशच्या आईवडिलांची डीएनए तपासणी केली. त्यात दिनेश आणि त्याच्या वडिलांचा रक्तगट जुळून आला. डीएनएन अहवाल येताच मृत हा दिनेश आहे याची खात्री पटली. त्यावरून पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला.

अखेर मलिंगा हत्याकांड उघडकीस; डीएनए चाचणीवरून लागला शोध
क्लिनिकल ट्रायल अंतर्गत लहान मुलांना मिळाला लसीचा पहिला डोज

असे सापडले आरोपी

मलिंगाचे मारेकरी कोण? असा प्रश्न पोलिसांना पडला. ही माहिती आरोपींना समजल्याने ते नागपुरातून पसार झाले. पोलिसांना आरोपींची नावे समजली. त्यामुळे दोन पथके बिहारला पाठविण्यात आली. कुणाल यास आरा (जि. भोजपूर) येथून तर चंदन यास सातपूर (जि. सारन) येथून ताब्यात घेऊन नागपूरला आणले. त्यांची चौकशी केली असता त्यांनी खुनाची कबुली दिली. पोलिसांनी त्यांना न्यायालयात हजर करून त्याची ११ जूनपर्यंत पोलिस कोठडी घेतली. ही कामगिरी आयपीएस नुरूल हसन यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार युवराज हांडे, नवनियुक्त पोलिस उपनिरीक्षक विजय नेमाडे, विजय काढे, देवेंद्र सूर्यवंशी यांनी केली.

( 2 people arrested in Malinga death case in nagpur)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com