Data Leak : सावधान! तुमचं अकाऊंट सेफ तर आहे ना? इतिहासातील सर्वात मोठ्या डेटा लिकचा उलगडा, तब्बल १६०० कोटी पासवर्ड्स हॅक

१६०० कोटी पासवर्ड्स लिक झाल्याची माहिती समोर आली असून, Apple, Google, Facebook, Telegram सारख्या सेवांवर धोका निर्माण झाला आहे. Google ने वापरकर्त्यांना 2FA आणि Passkey वापरण्याचा सल्ला दिला आहे.
Data Leak : सावधान! तुमचं अकाऊंट सेफ तर आहे ना? इतिहासातील सर्वात मोठ्या डेटा लिकचा उलगडा, तब्बल १६०० कोटी पासवर्ड्स हॅक
esakal
Updated on

सायबर सुरक्षेच्या जगतातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. Apple, Google, Facebook, Telegram आणि इतर अनेक डिजिटल सेवा वापरणाऱ्या कोट्यवधी वापरकर्त्यांचा वैयक्तिक डेटा धोक्यात आला आहे. लिकच्या घटनेत तब्बल १६०० कोटी लॉगिन क्रेडेन्शियल्स (ID आणि पासवर्ड्स) इंटरनेटवर गुपचूपपणे लीक झाल्याचं उघड झालं आहे Keeper Security चे CEO डॅरेन गोसियन म्हणाले...

"हे लीक इतर सर्व डेटाब्रिचेसपेक्षा मोठी आहे. वापरकर्त्यांनी तत्काळ सुरक्षा उपाय करणे अत्यंत गरजेचे आहे." तुमचे सोशल मीडिया खाते, बँक खाते किंवा ईमेल सुरक्षित आहे का? एकदा खात्री करून घ्या! पासवर्ड बदला आणि सुरक्षा वाढवा कारण पुढचा टप्पा कदाचित तुमचा असू शकतो

हे माहिती लिक इतकी मोठी आहे की तिला "इतिहासातील सर्वात मोठे डेटा लिक" असं सायबर तज्ञांनी संबोधलं आहे. Forbes च्या अहवालानुसार, ही लीक झालेली माहिती केवळ सोशल मीडिया अकाउंट्सपुरती मर्यादित नाही, तर त्यामध्ये शासकीय पोर्टल्स, कॉर्पोरेट प्लॅटफॉर्म्स, VPN लॉगिन्स, GitHub सारख्या डेव्हलपर टूल्स आणि इतर अनेक संवेदनशील सेवांचा समावेश आहे.

कुठून उघड झाली लिकची माहिती?

सायबर सुरक्षा संशोधकांनी एक 'मिस्टेरियस डेटाबेस' शोधून काढला आहे ज्यामध्ये तब्बल १८४ दशलक्ष रेकॉर्ड्स असलेली माहिती एका अनसिक्युअर्ड वेब सर्व्हरवर ठेवलेली आढळली. त्यातील केवळ ३० डेटासेट्सचे विश्लेषण केल्यावर ३५० कोटी हून अधिक रेकॉर्ड्समध्ये पासवर्ड्स, ईमेल आयडी, सोशल मीडिया लॉगिन्स, VPN माहिती इत्यादी सापडली.

या लीकमध्ये फक्त जुन्या माहितीचा समावेश नसून, २०२५च्या सुरुवातीपासून आजपर्यंतच्या नवीन लॉगिन डेटाचाही समावेश आहे. याचा अर्थ सायबर क्रिमिनल्सकडे वापरकर्त्यांची चालू माहिती असू शकते.

Data Leak : सावधान! तुमचं अकाऊंट सेफ तर आहे ना? इतिहासातील सर्वात मोठ्या डेटा लिकचा उलगडा, तब्बल १६०० कोटी पासवर्ड्स हॅक
Aadhar QR App : घरबसल्या काही मिनिटांत करा आधार अपडेट! UIDAI च्या नव्या QR कोड बेस्ड अ‍ॅपची एन्ट्री, कसं वापरायचं? पाहा एका क्लिकवर..

वापरकर्त्यांसमोर धोके कोणते?

  • फिशिंग हल्ले: सायबर गुन्हेगार या पासवर्ड्सचा वापर करून बनावट ईमेल/लिंक पाठवून वापरकर्त्यांना गंडवू शकतात.

  • व्यावसायिक ईमेल हॅकिंग: बिझनेस ईमेल्स हॅक करून आर्थिक फसवणूक केली जाऊ शकते.

  • खाजगी माहिती लीक: वापरकर्त्यांचे फोटो, व्हिडिओ, व्यक्तिगत संवाद लीक होण्याची शक्यता.

  • सोशल मीडिया हॅकिंग: वापरकर्त्यांची ओळख चोरी करून बनावट प्रोफाइल्स तयार केल्या जाऊ शकतात.

Data Leak : सावधान! तुमचं अकाऊंट सेफ तर आहे ना? इतिहासातील सर्वात मोठ्या डेटा लिकचा उलगडा, तब्बल १६०० कोटी पासवर्ड्स हॅक
Fastag New Rules : वर्षभराचा टोल टॅक्स फक्त 3 हजार रुपयात! पण जास्त खुश होऊ नका, अटी वाचून लावाल डोक्याला हात..

Google कडून सुरक्षेसाठी महत्त्वाचा सल्ला

Google ने या पार्श्वभूमीवर सर्व वापरकर्त्यांना पुढील उपाय तात्काळ करण्याचं आवाहन केलं आहे

  1. लगेच पासवर्ड बदला विशेषतः जर तुम्ही अनेक ठिकाणी एकाच पासवर्डचा वापर करत असाल.

  2. 2FA (Two-Factor Authentication) सुरू करा OTP किंवा अॅपवर आधारित पुष्टीची पद्धत.

  3. Passkey फीचर वापरा फिंगरप्रिंट, फेस आयडी किंवा पॅटर्न लॉकवर आधारित लॉगिन सुरक्षा. हे फिशिंग हल्ल्यांना रोखण्यास प्रभावी मानलं जातं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com