Cancer Medicine : गोगलगाईच्या श्र्लेष्मात सापडलं चक्क कर्करोगाचे औषध, जुन्नरच्या महाविद्यालयाचे संशोधन; ‘NCL’ चाही सहभाग

Snail Slime : या प्रणालीमध्ये हिवताप, डेंगी, चिकनगुनिया, झिका विषाणू यांसारख्या इतर रोगांची संख्या वाढवणाऱ्या डासांच्या अळ्यांचा नायनाट करणारी प्रचंड क्षमता आहे.
Cancer Medicine in Snail Slime
Cancer Medicine in Snail SlimeeSakal

शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरणाऱ्या गोगलगाईच्या श्र्लेष्मात प्रथमच प्रतिजैविकांसह कर्करोगविरोधी औषधांची पुष्टी झाली आहे. तसेच रोगकारक डासांच्या अळींचा नायनाट करणारी जैव-नॅनोकॉम्पोझिट प्रणालीही विकसित करण्यात जुन्नरच्या श्री शिव छत्रपती महाविद्यालयातील संशोधकांना यश आले आहे. या पूर्वीही याच शास्त्रज्ञांनी कर्करोगविरोधी गुणधर्मांची शक्यता वर्तविणारा शोधनिबंध प्रसिद्ध केला होता.

शास्त्रज्ञांच्या चमूने ‘जायंट आफ्रिकन स्नेल’ अर्थात ‘अचॅटिना फुलिका’ गोगलगाईच्या श्लेष्मापासून (चिकट स्राव) तांबे आणि कोबाल्ट ऑक्साइड जैव-नॅनोकॉम्पोझिटचे संश्लेषण केले आहे. महाविद्यालयाच्या प्राणिशास्त्र विभागाचे प्रमुख व उपप्राचार्य प्रा. डॉ. रवींद्र चौधरी म्हणाले, ‘‘गोगलगाईच्या श्लेष्मात अल्प प्रमाणात प्रथिने असतात. ते जैव-रासायनिक संयुगाच्या संश्लेषणादरम्यान मदत करतात. त्यावरील आवरण म्हणून काम करतात.’’

अभ्यासातील एक संशोधक डॉ. प्रमोद माने सांगतात, ‘‘सध्याच्या जैव-नॅनोकॉम्पोझिटमध्ये स्टॅफिलोकोकस ऑरियस, स्यूडोमोनास एरोजिनोसा या प्रतिजैविकांना दाद न देणाऱ्या जिवाणू प्रतिबंधक गुणधर्म दिसून आलेले आहेत.’’ जैव-नॅनोकॉम्पोझिटने मानवी गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग, स्तनाचा कर्करोग तसेच आतड्याच्या कर्करोगाच्या पेशींविरुद्ध अत्यंत आश्वासक असे कर्करोगविरोधी गुणधर्म दाखविलेले असल्याची माहिती संशोधक डॉ. दीपाली माने आणि आदित्य चौधरी यांनी दिली.

Cancer Medicine in Snail Slime
Scientists Talk To Whale : शास्त्रज्ञांनी चक्क व्हेलशी मारल्या गप्पा; आता एलियन्सशी संवाद साधताना होणार संशोधनाचा फायदा

अशोक खडसे म्हणाले, ‘‘या प्रणालीमध्ये हिवताप, डेंगी, चिकनगुनिया, झिका विषाणू यांसारख्या इतर रोगांची संख्या वाढवणाऱ्या डासांच्या अळ्यांचा नायनाट करणारी प्रचंड क्षमता आहे.’’ हे संशोधन बायोमेड सेंट्रल आणि स्प्रींजर-नेचर या प्रख्यात आंतरराष्ट्रीय प्रकाशनाच्या ‘कॅन्सर नॅनोटेक्नॉलॉजी’ शोधपत्रिकेत नुकतेच प्रसिद्ध झाले आहे. यामध्ये राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचाही (एनसीएल) सहभाग आहे.

संशोधनाची वैशिष्ट्ये

  • जैव-नॅनोकॉम्पोझिटचा औषधी उपयोग असून, कोणत्याही जीवमात्राला हानी होत नाही.

  • तांबे आणि कोबाल्ट ऑक्साइड जैव-नॅनोकॉम्पोझिटचे प्रयोग गहू पिकावर केले. गव्हाच्या उगवण क्षमतेवर तसेच त्यातील हरितद्रव्य, मुळांची आणि खोडाच्या वाढीवर कोणताही दुष्परिणाम होत नसल्याचे अभ्यासातून सिद्ध झाले आहे.

Cancer Medicine in Snail Slime
NASA Cat Video : नासाने अंतराळातून पाठवला मांजराचा व्हिडिओ; मानवाला मंगळावर जाण्यासाठी होणार याची मदत

प्राचीन काळापासून प्राणी आणि त्यांच्यापासून मिळणाऱ्या विविध घटकांचा औषधांसाठी वापर केला जात आहे. मानवाच्या औषधी उपचारांसाठी प्राणी संसाधनांचे महत्त्वही अनन्यसाधारण आहे. आधुनिक युगात नॅनोटेक्नॉलॉजी आणि जैविक साधनांची सांगड घालणे हे जैवविविधतेच्या निरंतर वापरातून शाश्वत विकासाचे उत्तम उदाहरण आहे.’’

- प्रा. डॉ. रवींद्र डी. चौधरी, प्रमुख संशोधक व उपप्राचार्य श्री शिव छत्रपती महाविद्यालय

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com