
व्हॉट्सअॅप आजच्या काळातील अत्यंत महत्त्वाचे अॅप आहे, ज्यावर 3.5 अब्जाहून अधिक लोक जगभरात अवलंबून आहेत. यामुळे मित्रपरिवाराशी संवाद साधण्यापासून ते रोजच्या कामांसाठी मदत मिळवण्यापर्यंत या अॅपचे महत्त्व खूप वाढले आहे. मात्र याच्या वापरामध्ये जर काळजी न घेतली तर तुमचे व्हॉट्सअॅप अकाऊंट बंद होऊ शकते ज्यामुळे तुमचे महत्वाचे काम थांबू शकते.
अलीकडच्या रिपोर्टनुसार, मेटा कंपनीने फेब्रुवारी महिन्यात भारतात जवळपास 9.7 मिलियन व्हॉट्सअॅप अकाऊंट्स बंद केले आहेत. व्हॉट्सअॅप वापरत असताना तुम्हाला काही समस्या येत असल्यास ते अकाऊंट बंद झालेले असू शकते. व्हॉट्सअॅपच्या माहितीप्रमाणे, यापैकी 1.4 मिलियन अकाऊंट्स ही कंपनीने स्वतःच बंद केले, कारण त्यांना वाईट वर्तणुकीचे संकेत आधीच मिळाले होते.
व्हॉट्सअॅपने आपला मासिक सुरक्षा अहवाल जाहीर केला आहे, ज्यामध्ये असे सांगितले की, या 9.7 मिलियन अकाऊंट्सवर कारवाई केली गेली कारण ते सुरक्षा नियमांचे उल्लंघन करीत होते किंवा प्लॅटफॉर्मच्या मार्गदर्शक तत्त्वांची पायमल्ली करत होते. व्हॉट्सअॅपचे प्रवक्ते म्हणाले की, कंपनी स्पॅम, खोट्या संदेशांबद्दल आणि फसवणुकीच्या कामांवर सतत नियंत्रण ठेवण्यासाठी आपली धोरणे अधिक कडक करत आहे.
जर तुम्ही व्हॉट्सअॅपवर स्पॅम संदेश पाठवत असाल, तर तुमचं अकाऊंट बंद होऊ शकते. अशा संदेशांचा प्रसार टाळा. तसेच, अनावश्यकपणे सोशल मीडियावर पोस्ट्स किंवा संदेश फॉरवर्ड करणे टाळा. घृणास्पद भाषेचा वापर किंवा संवेदनांना दुखावणारे कोणतेही सामग्री शेअर करणे देखील धोक्याचे ठरू शकते. याशिवाय, अश्लील कंटेंट किंवा गुन्हेगारी संबंधित सामग्री व्हॉट्सअॅपवर पाठवणे टाळा.
व्हॉट्सअॅपने नवीन स्टेटस फीचर सुद्धा लाँच केले आहे. आता तुम्ही व्हॉट्सअॅप स्टेटसवर शॉर्ट म्युझिक क्लिप्स जोडू शकता. एकाच क्लिकमध्ये तुम्ही लाखो गाण्यांमधून तुमच्यासाठी योग्य गाणं निवडू शकता.
फोटोसाठी 15 सेकंद आणि व्हिडिओसाठी 60 सेकंद पर्यंतच्या गाण्यांची क्लिप्स शेअर केली जाऊ शकतात, ज्यामुळे तुमच्या स्टेटसला एक मजेदार म्युझिकल टच मिळतो.
सुरक्षितता आणि नकोशा गोष्टींपासून बचाव करण्यासाठी व्हॉट्सअॅपने कडेकोट सुरक्षा उपाय लागू केले आहेत. हे सुनिश्चित करण्यासाठी, व्हॉट्सअॅप कृत्रिम बुद्धिमत्ता, डेटा सायन्स, आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत आहे. या उपायांमुळे वापरकर्त्यांना धोक्यापासून वाचवले जाते आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाते.
व्हॉट्सअॅपचा योग्य वापर करून आणि या वर्तणुकीवर नियंत्रण ठेवून तुम्ही तुमचा अनुभव सुरक्षित आणि मजेदार ठेवू शकता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.