Zuckerberg Apology : 'तुमचे हात रक्ताने माखलेत..', सिनेटरच्या आरोपांनंतर मार्क झुकरबर्गने मागितली पालकांची माफी! म्हणाला...

सोशल मीडियावर लहान मुलांच्या सुरक्षिततेबाबत अमेरिकेतील सिनेट ज्युडिशिअरी कमिटीने पावलं उचलली आहेत. या समितीने मेटा, टिकटॉक, एक्स आणि इतर सोशल मीडिया कंपन्यांच्या उच्च अधिकाऱ्यांवर प्रश्नांचा भडिमार केला.
Mark Zuckerberg Apology
Mark Zuckerberg ApologyeSakal

US Senet Hearing : सोशल मीडियावर लहान मुलांच्या सुरक्षिततेबाबत अमेरिकेतील सिनेट ज्युडिशिअरी कमिटीने पावलं उचलली आहेत. या समितीने मेटा, टिकटॉक, एक्स आणि इतर सोशल मीडिया कंपन्यांच्या उच्च अधिकाऱ्यांवर प्रश्नांचा भडिमार केला. यावेळी मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांना सर्वाधिक टीकेला सामोरं जावं लागलं. त्यानंतर त्यांनी उपस्थित पालकांची माफी मागितली.

अमेरिकेतील खासदारांनी या सर्व कंपन्यांच्या सीईओंना चांगलंच धारेवर धरलं. लहान मुलांच्या सुरक्षेपेक्षा आपल्या प्लॅटफॉर्मच्या नफ्याबद्दल तुम्ही जास्त विचार करता, असे आरोप त्यांच्यावर करण्यात आले. या सुनावणीला 'डिस्कॉर्ड'चे सीईओ जेसन सिट्रोन, स्नॅपचॅटचे सीईओ इव्हान स्पीगल, टिकटॉकचे सीईओ शॉ जी च्यू, एक्सच्या सीईओ लिंडा याकारिनो आणि मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्ग उपस्थित होते.

मुलांनी अन् पालकांनी सांगितले अनुभव

या सुनावणीची सुरुवातच एका व्हिडिओने करण्यात आली, ज्यामध्ये लहान मुलांनी त्यांना सोशल मीडियावर आलेले भयानक अनुभव सांगितले. फेसबुकवर माझा लैंगिक छळ झाला, असं एका लहान मुलाने सांगितलं. या सर्व मुलांची ओळख लपवण्यात आली होती.

सभागृहात उपस्थित पालकांनी देखील आपल्या मुलांना आलेल्या अनुभवांची माहिती यावेळी दिली. सोशल मीडियावरील गैरप्रकारांमुळे आपल्या मुलांना गमावलेल्या पालकांनी जेव्हा आपले अनुभव सांगितले, तेव्हा सभागृहाचं वातावरण अगदी गंभीर झालं होतं.

Mark Zuckerberg Apology
Elon Musk Tesla Package : इलॉन मस्कचा पगार होणार कमी? कोर्टानेच दिला निर्णय! टेस्लामध्ये मिळतात तब्बल 56 बिलियन डॉलर्स

झुकरबर्गने मागितली माफी

या सगळ्यात मार्क झुकरबर्ग यांच्याविरोधात पालकांचा मोठा रोष दिसून आला. फेसबुक आणि इन्स्टाग्राम हे दोन्ही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म मेटाच्या मालकीचे आहेत. सिनेटर जॉश हॉले यांनी झुकरबर्गला प्रश्न विचारले. "तुमच्या प्लॅटफॉर्ममुळे ज्या पालकांचं, मुलांचं नुकसान झालं आहे त्यांना तुम्ही कधी काही मदत केली आहे?" या प्रश्नावर झुकरबर्गने नकारार्थी उत्तर दिलं. त्यानंतर हॉले म्हणाले, "पीडित मुलांचे कुटुंबीय इथे आहेत.. तुम्ही त्यांची माफी मागाल?"

यानंतर झुकरबर्ग आपल्या जागेवरुन उठले, आणि माईकपासून दूर जात त्यांनी थेट पालकांकडे पाहत सर्वांची माफी मागितली. यावेळी पालकांनी आपल्या मुलांचे फोटो दाखवत झुकरबर्ग यांना मूक विरोध केला. या सर्व विरोधातही झुकरबर्ग यांनी आपलं वाक्य पूर्ण केलं.

"तुम्हाला जे सहन करावं लागलं आहे, त्यासाठी मी खरोखरच माफी मागतो. तुमच्या कुटुंबीयांना जो कटू अनुभव आला तो कुणाच्याच वाट्याला येऊ नये. मेटा हे लहान मुलांच्या सुरक्षिततेसाठी सातत्याने प्रयत्न करत आहे.." असं ते म्हणाले.

Mark Zuckerberg Apology
Cyber Security : एआय अ‍ॅप्स आणि स्मार्ट होममुळे लहान मुलांना अधिक सायबर धोका; रिपोर्टमध्ये बाब उघड

"तुमचे हात रक्ताने माखलेले.."

यानंतर खासदारांनी आणि सिनेटर्सनी उपस्थिती सीईओंवर प्रश्नांचा भडिमार केला. सीईओंनी आपली बाजू मांडताना सारवासारव केल्याचा प्रयत्न केल्यामुळे सिनेटर लिंडसे ग्राहम चांगलेच चिडले. ते म्हणाले, "मिस्टर झुकरबर्ग, तुमचे प्रॉडक्ट लोकांचे जीव घेत आहेत.. तुमचे हात रक्ताने माखलेले आहेत."

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com