Kids Safety on Facebook : लहान मुलांच्या सुरक्षिततेसाठी 'मेटा'नं उचललं पाऊल; फेसबुक आणि इन्स्टाबाबत घेतला मोठा निर्णय!

लहान मुलांना फेसबुक किंवा इन्स्टाग्रामवर सेन्सिटिव्ह कंटेंट दिसू नये यासाठी काही नवीन टूल्स लाँच करण्यात आले आहेत. या माध्यमातून ठराविक सर्च रिझल्ट हे लहान मुलांपासून लपवून देखील ठेवता येणार आहेत.
Meta on Teen Cyber Safety
Meta on Teen Cyber SafetyeSakal

Facebook-Insta Age Restrictive Content : आजकाल घरा-घरांमध्ये स्मार्टफोन दिसून येतो. यामुळे घरातील लहान मुलांच्या हातात देखील मोबाईल दिसून येतो. इंटरनेट आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून मुलांपर्यंत कित्येक वेळा नकोसा कंटेंट पोहोचतो. यावर उपाय म्हणून आता मेटाने पाउल उचललं आहे.

लहान मुलांना फेसबुक किंवा इन्स्टाग्रामवर सेन्सिटिव्ह कंटेंट दिसू नये यासाठी काही नवीन टूल्स लाँच करण्यात आले आहेत. या माध्यमातून ठराविक सर्च रिझल्ट हे लहान मुलांपासून लपवून देखील ठेवता येणार आहेत. सोबतच कंपनीने एक नवीन फीचर लाँच केलं आहे, ज्यामुळे मुलांनी धोकादायक गोष्टी सर्च केल्यास, त्या विषयी प्रबोधन किंवा मदत करणारे रिझल्ट त्यांना दिसणार आहेत. (Meta on Teen Cyber Safety)

फेसबुक आणि इन्स्टावरील सर्व लहान मुलांच्या अकाउंटला मोस्ट रेस्ट्रिक्टिव्ह कंटेंट कंट्रोल सेटिंग ही डिफॉल्ट असणार आहे. नवीन अकाउंट्सना ही सेटिंग लागू झाली आहे. तसंच, जुन्या अकाउंट्सना देखील ही सेटिंग लागू केली जात आहे. एबीपीने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. (Meta Safety tools for Kids)

Meta on Teen Cyber Safety
Drishti 10 Starliner : भारतीय नौदलासाठी अदानींच्या कंपनीने बनवलं खास ड्रोन! काय आहेत फीचर्स?

काय होणार फायदा?

या माध्यमातून लहान मुलांना सुसाईड, सेल्फ हार्म, ईटिंग डिसऑर्डर अशा प्रकारच्या धोकादायक गोष्टींपासून लांब ठेवलं जाईल. मुलांना आपल्या एक्सप्लोअर फील्डमध्ये अशा प्रकारच्या गोष्टी दिसणार नाहीत. यूजर्सना त्यांच्या वयानुसारच कंटेंट दिसेल, असं मेटाने स्पष्ट केलं.

मेटाने एका ब्लॉग पोस्टमध्ये म्हटलं आहे, की लहान मुलांनी आपले इन्स्टाग्राम प्रायव्हसी सेटिंग अपडेट करुन घ्यावेत. याबाबत कंपनीने मुलांना नोटिफिकेशन देखील पाठवण्यास सुरुवात केली आहे. केवळ एका क्लिकवर यूजर्स आपल्या सर्व प्रायव्हसी सेटिंग्स अपडेट करु शकणार आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com