

Indian-origin startup offers jobs to laid-off Meta staff, pay up to ₹5.2 cr
Sakal
Meta Layoffs 600 Employees: तंत्रज्ञान क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनी मेटाने त्यांच्या ‘Superintelligence Labs’ या टिमला सोडून आर्टिफिशिअल इंटेलिजन्स विभागातून जवळपास ६०० कर्मचाऱ्यांना काढून टाकले आहे.
मार्क झुकरबर्ग च्या नेतृत्वाखालील चालणाऱ्या या कंपनीच्या लेऑफचा मात्र भारतीय उद्योजकाने लगेच फायदा उचलला आहे. आणि कर्मचाऱ्यांना तब्बल दीड ते साडेपाच कोटी पगार देणार आहे.
अमेरिकेत स्थायिक असलेल्या सुदर्शन कामत यांनी Smallest AI ही स्टार्टअप कंपनी सुरु केली आहे. या कंपनीमार्फत मेटामधून काढून टाकलेल्या कर्मचाऱ्यांसाठी त्यांनी मोठी संधी निर्माण केली आहे. त्यासाठी सुदर्शन यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वर पोस्ट केली आहे.