mg gloster facelift launch 31 august with adas feature check details here
mg gloster facelift launch 31 august with adas feature check details here

उद्या लॉंच होतेय MG Motors ची नवीन कार, जाणून घ्या डिटेल्स

एमजी मोटर्स इंडिया 31 ऑगस्ट रोजी त्यांची ग्लोस्टर फेसलिफ्ट लॉन्च करणार आहे. कंपनीने लॉन्चपूर्वी या गाडीचा टीझरही जारी केला आहे.आपल्या लेटेस्ट सोशल मीडिया पोस्टमध्ये, चीनी मालकीच्या ब्रिटीश कार कंपनीने कंन्फर्म केले आहे की आगामी ग्लोस्टर फेसलिफ्ट 4×4 सिस्टीमसह तसेच ADAS फीचरसह येईल.

MG Gloster च्या सध्याच्या मॉडेलची किंमत रु. 31.5 लाख ते रु. 40 लाख (एक्स-शोरूम) दरम्यान आहे.आता नवीन मॉडेलची किंमत सध्याच्या वाहनापेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे. किंमतीतील ही वाढ ADAS फीचर आणि 4×4 सीस्टीमच्या अपडेटमुळे देखील असू शकते.

एमजी ग्लोस्टर ही थ्री रो एसयूव्ही आहे. हे एकतर 6-सीटर किंवा 7-सीटर ऑप्शनसह येते. ही गाडी अनेक स्टँडर्ज टेक्निकल आणि सेफ्टी फीचर्ससह येते. ऑटो लेव्हलिंगसह एलईडी हेडलाइट्स, एलईडी डीआरएल, एलईडी टेल लॅम्प, 12.3-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, ब्लूटूथ म्यूझीक, कॉलिंग फीचर, लेदरेट अपहोल्स्ट्री, डॅशबोर्डवरील सॉफ्ट टच मटेरियल आणि डोअर कार्ड यासारख्या फीचर्ससह येते.

mg gloster facelift launch 31 august with adas feature check details here
लाँच झाले Mivi चे तीन ऑडिओ प्रॉडक्ट्स, मिळतो 72 तास प्लेबॅक अन् बरंच

MG Gloster मध्ये कंपनीने 2 लिटर ट्विन टर्बो चार्ज डिझेल इंजिन दिले आहे. हे इंजिन 480 Nm टॉर्क आणि 218 PS पॉवर जनरेट करते. कारमध्ये 8-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन दिले आहे. एसयूव्ही 7 ड्रायव्हिंग मोड्सने सुसज्ज आहे - ऑटो, रॉक, सँड, मड, स्नो, स्पोर्ट, इको. दोन्ही इंजिन 8-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनशी जोडलेले असताना, कमी-पॉवर असलेली कार फक्त 2-व्हील-ड्राइव्हमध्ये असू शकते, तर ट्विमन टर्बो डिझेल 4-व्हील-ड्राइव्हसह येते आणि या कारमध्ये टेरेन सिलेक्शन फीचर देखील मिळते.

mg gloster facelift launch 31 august with adas feature check details here
पाकमधील पुराच्या हाहाकारावर PM मोदींनी व्यक्त केल्या भावना; म्हणाले...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com