esakal | स्वस्त झाला Micromax IN Note 1, काय असेल नवीन किंमत? वाचा
sakal

बोलून बातमी शोधा

Micromax IN Note 1

स्वस्त झाला Micromax IN Note 1, काय आहे नवीन किंमत?

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

भारतात Micromax IN Note 1ची किंमत कंपनीकडून कमी करण्यात आली आहे. ग्राहकांना आता हा मायक्रोमॅक्सचा फोन कमी किंमतीत खरेदी करता येणार आहे. मायक्रोमॅक्सने गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये मायक्रोमॅक्स इन नोट 1 या फोन एंट्री-लेव्हल व्हेरियंट 10,999 रुपयांच्या किंमतीत लॉन्च केला होता, नंतर कंपनीने मे महिन्यात किंमत वाढवून 11,499 रुपये केली होती.

Micromax IN Note 1 ची किंमत

Micromax IN Note 1 या स्मार्टफोनच्या 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज व्हेरियंटची नवीन किंमत आता 9,499 रुपय झाली आहे. आधी त्याची किंमत 10,999 रुपये होती, आता हा स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी तुम्हाला 1,500 रुपय कमी मोजावे लागणार आहेत. यासोबतच फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेल मध्ये(3 ऑक्टोबर ते 10 ऑक्टोबर दरम्यान) अॅक्सिस बँक आणि आयसीआयसीआय बँक कार्ड वापरून तुम्ही फोनवर 10 टक्के सूट देखील मिळवू शकता. ही सूट मिळाल्यास तुम्ही मायक्रोमॅक्स इन नोट 1 हा स्मार्टफोन 8,549 रुपयांना खरेदी करू शकता. दरम्यान या फोनच्या 128GB व्हेरियंटची किंमत अजूनही पूर्वीइतकीच 12,999 रुपये आहे.

हेही वाचा: अगदी कमी किमतीत खरेदी करा 7 सीटर कार, 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन

फीचर्स काय आहेत?

या स्मार्टफोनमध्ये 6.67-इंच फुल-एचडी+ एलसीडी स्क्रिन देण्यात आली आहे ज्यावर पंच-होल डिझाइन आहे. फोनमध्ये MediaTek Helio G85 प्रोसेसर तसेच 4 जीबी रॅम, 64 जीबी आणि 128 जीबी स्टोरेज मायक्रोएसडी कार्ड सपोर्टसह देण्यात आले आहे. इन नोट 1 मध्ये फ्रंटला 16-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा दिला आहे. तर 48-मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा, 5-मेगापिक्सलचा अल्ट्रावाइड कॅमेरा, 2-मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसिंग कॅमेरा आणि 2-मेगापिक्सेलचा मॅक्रो कॅमेरा दिला आहे. मायक्रोमॅक्स इन नोट 1 मध्ये 5000mAh ची बॅटरी आहे जी 18W फास्ट चार्जिंग आणि रिव्हर्स चार्जिंगला सपोर्ट करते. तसेच IN Note 1 हे आउट ऑफ द बॉक्स Android 10 सॉफ्टवेअर काम करतो.

हेही वाचा: 125cc बाईकचे बेस्ट ऑप्शन, तेही लाख रुपयांपेक्षा कमी किंमतीत

loading image
go to top