

Microsoft issues a cybersecurity warning after hackers exploit a 36-hour service outage to send fake emails and steal users' login credentials and banking information
esakal
मायक्रोसॉफ्टच्या अनेक सेवा तब्बल ३६ तास बंद राहिल्याने जगभरातील वापरकर्त्यांना अडचणींचा सामना करावा लागला होता. या कालावधीत आउटलुक, टीम्स आणि ऑफिसशी संबंधित अनेक ॲप्सचा वापर ग्राहकांना करता आला नाही. आता या तांत्रिक अडथळ्याचा फायदा सायबर गुन्हेगारांकडून घेतला जात असल्याची महत्त्वाची माहिती समोर आली आहे. हॅकर्स बनावट संदेश पाठवून वापरकर्त्यांची फसवणूक करण्याचा प्रयत्न करत असून, त्यांच्या लॉगिनची माहिती आणि पासवर्ड चोरण्याचा धोका निर्माण झाला आहे. यामध्ये बँक खात्यांशी संबंधित माहितीही चोरीला जाण्याची शक्यता असल्याचे मायक्रोसॉफ्टने स्पष्ट केले आहे.