

मायक्रोसॉफ्ट विंडोज 10 चा मोफत सपोर्ट १४ ऑक्टोबरपासून बंद करणार आहे
ज्यामुळे लाखो वापरकर्ते असुरक्षित राहतील.
हा निर्णय का घेण्यात याला आहे आणि याचा वापरकर्त्यांवर कसा परिणाम होणार जाणून घ्या
मायक्रोसॉफ्टने विंडोज 10 साठी मोफत सुरक्षा अपडेट (सिक्युरिटी अपडेट्स) 14 ऑक्टोबर 2025 पासून बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे जगभरातील लाखो वापरकर्त्यांचा डेटा धोक्यात येण्याची भीती आहे, असा इशारा कंझ्युमर रिपोर्ट्स या ग्राहक हक्क संस्थेने दिला आहे. मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नाडेला यांना लिहिलेल्या पत्रात संस्थेने विंडोज 10 साठी मोफत सुरक्षा सपोर्ट ठिंबा सुरू ठेवण्याची मागणी केली आहे. विंडोज 11 वर अपग्रेड न होऊ शकणाऱ्या उपकरणांच्या वापरकर्त्यांना यामुळे सायबर हल्ल्यांचा धोका वाढेल, असा युक्तिवाद संस्थेने केला आहे.